आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थान:इमर्जन्सी वाॅर्ड बनवत महिनाभरात वाचवले 25 हृदयरुग्णांचे प्राण

ओम शर्मा } सीकर (राजस्थान)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या रानोली गावचे शिवभगवान यांना गेल्या वर्षी हार्टअटॅक आला. स्थानिक रुग्णालयात सुविधा न मिळाल्याने त्यांना सीकरला पाठवले. मात्र, रस्त्यातच त्यांनी जीव सोडला. अशी आणखी २-३ प्रकरणे आली तेव्हा ग्रामस्थांनी स्थानिक सामाजिक आरोग्य केंद्रात अशा रुग्णांसाठी प्राथमिक उपचाराच्या सुविधा दिल्या. हृदयरुग्णांसाठी येथे इमर्जन्सी वाॅर्ड सुरू करण्यासह तपासणीची उपकरणे खरेदी केली. दानदात्यांकडून १० लाख रुपये जमा केले. ४ स्थानिक डॉक्टरांना जयपूरच्या कार्डियोलॉजिस्टकडून प्रशिक्षण दिले. गावातील लोकांना आता स्थानिक पातळीवरच प्राथमिक उपचार मिळत आहेत. एका महिन्यातच २५ पेक्षा जास्त हृदयरुग्णांचे प्राण वाचवण्यात आले. राजेंद्र शास्त्री, नंदकिशोर साबू म्हणतात, ‘कार्डियोशी संबंधित तपासण्यांसाठी खासगी केंद्रांवर ५ हजार रुपये खर्च येतो. रानोलीच्या केंद्रात कोणतेच शुल्क घेतले जात नाही. येथे ७०० पेक्षा अधिक औषधी उपलब्ध आहेत. रुग्णालय प्रभारी डॉ. सुरेंद्र फरडोलिया सांगतात, येथे डिजिटल एक्स-रे, रक्तगट, मधुमेह, यकृत, मूत्रपिंडाशिवाय सीआरपीसह ३७ पेक्षा जास्त आजारांची तपासणी नि:शुल्क होते.