आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहे वृत्त अजमेर जिल्ह्यातील आहे. मी येथील हांसियावास गावात पोहोचल्यानंतर काही मुली शॉर्ट््स घालून फुटबॉल खेळताना दिसल्या. खेडेगावात मुली पुढे जात असल्याचे पाहून चांगले वाटले. मी त्यांच्याशी बोलण्यासाठी बसले असता या मुली किलबिलाट करत माझ्याशी बोलायला लागल्या. मात्र, या वेळी वेदनादायक भूतकाळही त्यांनी उलगडून सांगितला. त्या म्हणाल्या की, आमच्यासारख्या मुली बालविवाहासारख्या कुप्रथांविरोधात लढा देत आहेत.
मुली म्हणाल्या, कोरोनाकाळात शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले, पण अशा शिक्षणामुळे घरातील वातावरणात ‘सुरक्षित’ राहणार नाही असे घरच्यांना वाटत होते. त्यामुळे शिकवण्याऐवजी कमी वयातच लग्न करणे चांगले असे त्यांना वाटे. अनेक मुलींच्या घरचे लोक त्यांच्यावर लग्नाचा दबाव टाकू लागले. काही मुलींचे लग्नही झाले. बालविवाहही झाला. सपना-माेनिकाही यापैकीच आहेत. घरच्यांनी त्यांचा साखरपुडा करत लग्नाची तारीखही निश्चित केली. मात्र, त्या अडून बसल्या व घरच्यांना त्यांच्यापुढे झुकावे लागले. इतर मुलीही आपले आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आधी त्यांनी शॉर्ट््स घालण्याचा हट्ट धरला. मग फुटबॉल खेळणे सुरू केले. आज जिल्ह्यातील गावांमध्ये सुमारे ३९७ मुली फुटबॉल खेळत आहेत. सर्व शिकत आहेत.
हे आकडे चिंताजनक : एका वर्षात बालविवाहाची १६८ प्रकरणे
नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे-५ (२०१९-२०२१) च्या अहवालानुसार, २० ते २४ वर्षांच्या महिलांपैकी २५.४% महिलांचे लग्न १८ वर्षे वयाआधीच झाले आहे. तर विधानसभेच्या अहवालानुसार, २०२०-२०२१ मध्ये राजस्थानात १६८ बालविवाहाची प्रकरणे समोर आली आहेत. बालविवाह निषेध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झालेल्या प्रकरणांच्या जिल्हा ठाणेनिहाय स्थितीच्या अहवालानुसार, गेल्या पाच वर्षांमध्ये ४६ बालविवाहाचेच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.