आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवीन कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 25 वा दिवस आहे. शेतकऱ्यांची रविवारी अपील केली की, 27 डिसेंबरला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी रेडिओवर 'मन की बात' करतील, तेव्हा सर्वांनी आपल्या घरात थाळ्या वाजवाव्यात. भारतीय शेतकरी यूनियनचे जगजीत सिंग डल्लेवाला म्हमाले की, शेतकऱ्यांनी 25 ते 27 डिसेंबरपर्यंत हरियाणामध्ये सर्व टोल प्लाजा फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
तिकडे, यूपीच्या गाजीपूर बॉर्डरवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी नेत्यांनी गाझियाबाद अॅडिमिनिस्ट्रेशनला 24 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी आरोप लावला आहे की, राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त करण्यात येत आहेत. जर हा प्रकार तात्काळ थांबवला नाही, तर हायवेची दुसरी लेनही बंद केली जाईल.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीतील रकाबगंज साहेब गुरुद्वारात पोहोचले. येथे ते नतमस्तक झाले. त्यांची भेटी पूर्वनियोजित नव्हती. ते अचानकपणे गुरुद्वारात पोहोचले.
दुसरीकडे कृषी कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी आज शहीद दिवस पाळला. या दरम्यान आंदोलनस्थळी आणि संपूर्ण पंजाबमध्ये शहीद शेतकऱ्यांचा श्रद्धांजली वाहण्यात आली. अनेक विशेष कार्यक्रम घेतले. भारतीय किसान युनियनचे मुख्य सचिव राम त्यागी यांनी ही माहिती दिली.
सिंघू सीमेवर पगडीचे लंगर
पंजाबहून आलेल्या स्वयंसेवकांच्या एका ग्रुपने सिंघू बॉर्डरवर पगडी लंगर सुरू केले आहे. येथे शेतकऱ्यांना मोफत पगडी बांधली जात आहे. स्वयंसेवक त्यांच्याबरोबर पगही घेऊन आले आहेत. ते देखील विनामूल्य देत आहेत. पगडी कशी बांधली जाते हे आम्ही लोकांना सांगत असल्याचे ते म्हणाले.
आंदोलन स्मरणात रहावे यासाठी शेतकऱ्यांना मोफत टॅटू
पंजाबच्या एका टॅटू आर्टिस्टने आंदोलनस्थळी स्टॉल लावला आहे. येथे शेतकऱ्यांना मोफत टॅटू गोंदवून दिले जात आहेत. टॅटू बनवणारे रविंद्र सिंग म्हणाले की, शेतकऱ्यांना प्रेरित करण्याचा या मागचा उद्देश आहे. यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचा स्मरणात राहील.
रविंद्र सांगतात की, मी लुधियानाहून आलो असून शेतकऱ्यांच्या हातावर टॅटू गोंदत आहे. हे देखील त्यांना पाठिंबा देण्याचा एक प्रकार आहे. आतापर्यंत 30 शेतकऱ्यांच्या हातावर टॅटू गोंदले आहेत. त्यापैकी बर्याच जणांनी ट्रॅक्टर, पिके, पंजाबचा नकाशा व प्रेरक कोट बनविला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.