आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 25 Workers At Each Booth, 20 Of Them In The Role Of Commons, Dummy Corona Vaccination Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना लसीकरणाचा सराव:प्रत्येक बूथवर 25 वर्कर, यातील 20 जण सर्वसामान्यांच्या भूमिकेत, आज डमी लसीकरण

नवांशहर/नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंजाबसह 4 राज्यांतील 8 जिल्ह्यांत तयारी पूर्ण

भारतात नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात कोरोना लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पंजाब, गुजरात, आसाम व आंध्र प्रदेशातील २-२ जिल्ह्यांत ड्राय रनची तयारी करण्यात आली. ड्राय रन मंगळवारी होईल. पंजाबातील नवांशहरमध्ये आरोग्य विभागाच्या पथकांनी बूथवर आवश्यक सुविधा तपासल्या. प्रतीक्षालय, व्हॅक्सिन रूम, निरीक्षण कक्ष तयार केले. येथे पाच बूथ बनवण्यात आले आहेत. एक बूथ खासगी रुग्णालयात आहे. मंगळवारी प्रत्येक बूथवर २५-२५ आरोग्य सेवक बोलावण्यात आले आहेत. यात २०-२० जण सामान्य लोकांच्या भूमिकेत असतील, म्हणजे त्यांना लस टोचण्यासाठी बोलावले आहे. एसएमएसद्वारे त्यांना सूचना दिली आहे. लसीकरणादरम्यान हीच प्रक्रिया असेल. म्हणजे ज्यांना एसएमएस येईल त्यांनाच बूथवर येऊ दिले जाईल. त्यासाठी को-विन अॅपवर नोंदणी करावी लागेल.

आज सर्वात आधी लस कोल्ड चेन पॉइंटवरून लसीकरण बूथपर्यंत पोहोचवली जाईल
बूथ कोठे आणि किती असतील?

ड्राय रनसाठी जिल्हा रुग्णालय वा शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत. ते फक्त सरावासाठी आहेत. मात्र, नंतर जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा गावोगावी बूथ असतील. ते जवळपास निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या पोलिंग बूथच्या माहितीच्या आधारे असतील.

ड्राय रनमध्ये काय होईल?
डमी लस कोल्ड चेन पॉइंटवरून बूथपर्यंत रेफ्रिजरेटरयुक्त मोबाइल व्हॅनद्वारे पाेहोचवली जाईल. बूथवर गर्दी नियंत्रणासाठी मॉक ड्रिल होईल. फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी कर्मचारी असतील. सोमवारी आढावा घेतला जाईल.

पूर्ण प्रक्रिया कोण पार पाडेल?
बूथवर एक वैद्यकीय अधिकारी, व्हॅक्सिन हँडलर, व्हॅक्सिनेटर, पर्यायी व्हॅक्सिनेटर, पर्यवेक्षक, डेटा मॅनेजर, आशा कार्यकर्ती, एक को- ऑर्डिनेटर असेल. ज्यांना लस दिली जाईल त्यांचे नाव, ओळखपत्राचा युनिक क्रमांक, पत्ता नोंदवला जाईल. कोणत्या व्हॅक्सिनेटरने कुणाला लस दिली, ती कोणत्या बॅच आणि कंपनीची होती, याची सर्व माहिती नोंद होईल. यानंतर रिअॅक्शन झाल्यास संबंधित बॅचच्या लसीची माहिती मिळेल.

ज्यांना लस द्यायची आहे, त्यांची पडताळणी कशी करण्यात येईल?
सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. ओळखपत्रातून त्याची पडताळणी होईल. ५० वर्षांवरील ज्यांना लस द्यायची आहे त्यांची पडताळणी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आकड्यांच्या आधारे होईल. को-विन अॅपद्वारे या लोकांना ट्रॅक केले जाईल. नोंदणी झालेल्यांपैकी कुणाला लस दिली व कोण बाकी आहे याबाबत या प्लॅटफॉर्ममध्ये रिअल टाइम मॉनिटरिंग होईल. प्राधान्याच्या आधारे आधी नोंदणी झालेल्यांचे लसीकरण होईल.

एका बूथवर दिवसभरात किती लोकांना लस टोचली जाईल?
एका दिवसात एका बूथवर १०० जणांनाच लस दिली जाईल. राज्ये त्यांच्या हिशेबाने लसीकरण सत्राचा दिवस आणि वेळ निश्चित करू शकतील. लसीकरणासाठी देशभरात एकूण किती बूथ असतील हे ठरवण्याचे अद्याप बाकी आहे.

बातम्या आणखी आहेत...