आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2.57 Lakh Tourists Visit Tulip Garden In 11 Days, Heat Makes Tulip Bloom Early| Marathi News

पृथ्‍वीवरील स्‍वर्ग:ट्युलिप उद्यानाला 11 दिवसांत 2.57 लाख पर्यटकांची भेट, उष्णतेमुळे ट्युलिप लवकर फुलले, बचावासाठी पाण्याचा शिडकावा

श्रीनगर-4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर-आशियातील सर्वात माेठे ट्युलिप गार्डन पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरले आहे. केवळ ११ दिवसांत येथे स्थानिक तसेच विविध भागांतील २.५७ लाख पर्यटकांनी भेट दिली. यंदा एप्रिलअखेरपर्यंत हे उद्यान पाहण्यासाठी सुमारे पाच लाखांवर पर्यटक भेट देतील असा अंदाज आहे. उष्णतेमुळे फुले काही दिवस आधीच उमलली आहेत. सध्या ६६ प्रजातींची १५ लाख फुले फुलल्याचे दिसते. महामारी संपुष्टात आल्याने पर्यटनाला गती मिळाली आहे. म्हणूनच विभागाने पर्यटकांना उरीलादेखील भेट देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.

हवामान : उष्णतेमुळे ट्युलिप लवकर फुलले, बचावासाठी पाण्याचा शिडकावा
श्रीनगरमध्ये रात्रीचे तापमान ८.६ अंश तापमान नोंदवले आहे. ते सरासरीहून २ अंशांने जास्त आहे. उष्णतेमुळे ट्युलिप लवकर फुलले. आगामी काळात पावसाने हजेरी लावली नाही तर फुलांचे आयुष्य घटेल. त्यामुळे फुलांवर पाण्याचा शिडकावा केला जात आहे.

नवे आकर्षण : लवकरच सुरू हाेणार जपानच्या धर्तीवर साेकुरा उत्सव
आगामी वर्षात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साेकुरा उत्सव सुरू करण्याची तयारी आहे. त्यासाठी ट्युलिप उद्यानात कॅफेटेरिया तयार करण्यात आला आहे. चेरीच्या उत्पादनासाठी लवकरच निविदा काढली जाईल. आगामी काळात जपानच्या साेकुरा उत्सवासारखा उत्सव खाेऱ्यात साजरा हाेईल.

बातम्या आणखी आहेत...