आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 2.74 Lakh Square Meters Of Open Space In Ayodhya, 12,879 Square Meters Will Be The Magnificent Temple Of Shri Rama; Administration Approval To Map

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राम मंदिर:अयोध्येत 2.74 लाख चौरस मीटर मोकळी जागा, 12,879 चौरस मीटरवर असेल श्रीरामाचे भव्य मंदिर; नकाशाला प्रशासनाची मंजुरी

अयोध्या3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
एडीएची बैठक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत उपाध्यक्ष डॉ. नीरज शुक्ला, बोर्डाचे सदस्य अनुज झा व अन्य सदस्यांचीही उपस्थिती होती.
  • अयोध्या विकास प्राधिकरण बोर्डाच्या बैठकीत काही मिनिटांतच नकाशाला मंजुरी, गुरुवारी ट्रस्टला नकाशा सादर करणार
  • श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने सिमेंट व काँक्रीटच्या दानशूरांची केली यादी तयार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्येतील मंदिराच्या पूजेनंतर अवघ्या २९ दिवसांनी बुधवारी मंदिराच्या नकाशास मंजुरी देण्यात आली आहे. अयोध्या विकास प्राधिकरण (एडीए) बोर्डाच्या बैठकीत सर्व सदस्यांनी काही मिनिटांतच नकाशास मंजुरीही दिली. गुरुवारी एडीए ट्रस्टकडे नकाशा सुपूर्द करण्यात येण्याची शक्यता आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम मंदिराबरोबरच संपूर्ण ७० एकर जमिनीच्या नकाशास मंजुरी दिली आहे. यासाठी ट्रस्टने २.११ कोटी रुपये विकास शुल्क व कामगार निधीपोटी १५ लाख ३६३ रुपयांचा ड्राफ्ट व इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरद्वारे रक्कम जमा केली आहे. आता लवकरच मंदिराच्या पायाभरणीचे काम सुरू होईल, असे ट्रस्टने सांगितले. एडीएचे चेअरमन व आयुक्त एम. पी. अग्रवाल यांनी सांगितले, ट्रस्टने ७० एकर परिसराचे दोन नकाशे पाठवले होते. एक नकाशा २ लाख ७४ हजार ११० चौरस मीटर लेआऊटचा होता. ही खुली जागा आहे. दुसरा नकाशा राम मंदिराचा आहे. तो १२,८७९ चौरस मीटर व्याप्त क्षेत्रात आहे. दोन्ही नकाशे बोर्डाच्या बैठकीत मंजूर करण्यात आले. ४९.२४ मीटर उंची, तळमजला ९९७२ चौरस मीटर, पहिला मजला १८५० चौरस मीटर आणि वरचा दुसरा मजला १०५६ चौरस मीटरचा असेल. नकाशानुसार, राम मंदिर व सुरक्षा भिंत पाच एकर परिसरात प्रस्तावित आहे. राम मंदिर बांधकामासाठी लार्सन अँड ट्रूब्रोची यंत्रे एका आठवड्यात येतील. यापैकी अवजड अशा दोन रिंग यंत्रांचा समावेश आहे. मंदिराच्या संपूर्ण ५ एकरात ६० मीटर खोल काँक्रीटचे १२०० खांब उभारण्यात येणार आहेत. विश्वस्तांनी सिमेंट व काँक्रीट उपलब्ध करून देणाऱ्या दानशूरांची यादी तयार केली आहे.

जमिनीपासून १९ फूट उंच तयार होईल मंदिराचा प्लॅटफॉर्म

विश्वस्तांनी सांगितले, एक रिंग मशीन कानपूरला आलेली आहे, तर दुसरी चेन्नईहून निघाली आहे. दहा दिवसांत आवश्यक यंत्रे व अवजारे अयोध्येत येतील. पायलिंगमध्ये जमिनीच्या आत तयार होणाऱ्या खांबात लोखंडाचा वापर होणार नाही. खांब तयार झाल्यानंतर त्यावर कॅप तयार होईल. नंतर त्यावर प्लॅटफॉर्म बांधण्यात येईल. त्यावर तीन मजले व पाच शिखरे व सुरक्षा भिंती असलेल्या मंदिरास आकार दिला जाईल. प्लॅटफाॅर्म जमिनीपासून सुमारे १९ फूट उंच असेल.