आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST संकलन:जुलैमध्ये कर संकलनात 1.49 लाख कोटी रुपये, 28% वाढ, करचोरीही घटली

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक घडामोडीत सुधारणा झाल्यामुळे या जुलैत जीएसटी संकलन १,४८,९९५ कोटी रु. झाले. जुलै २०१७ पासून जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर ही दुसरी सर्वांत मोठी मासिक वसुली आहे. याआधी एप्रिल २०२२ मध्ये १,६७,५४० कोटी रुपयांचे विक्रमी जीएसटी संकलन झाले होते. वार्षिक आधारावर पाहिल्यास गेल्या महिन्यात जीएसटी संकलन २८% वाढले आहे. जुलै २०२१ मध्ये हा आकडा १,१६,३९३ कोटी रु. होता. तज्ज्ञांनुसार, जीएसटी व्यवस्थेच्या चांगल्या पद्धतीसाठी केलेल्या उपाययाेजनांचाही परिणाम जीएसटी संकलनाच्या आकड्यात दिसला आहे.

पतमानांकन संस्था इक्राच्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर म्हणाल्या, गेल्या महिन्यात जीएसटी संकलन या वर्षीच्या १.४५ लाख कोटी रुपयांच्या मासिक सरासरी अंदाजापेक्षा जास्त आहे. भारतात केपीएमजीचे पार्टनर(इन-डायरेक्ट टॅक्स) अभिषेक जैन यांच्यानुसार, जीएसटी संकलनात संकलनात सततची वाढ होणे कोरोनाकाळातील मंदीतून बाहेर पडण्याचे संकेत आहेत. महागाई आणि करचोरी रोखण्यासाठी केलेले उपायही यामागचे कारण आहे. नुकतेच जीएसटी परिषदेचे दर तर्कसंगत बनवले आहेत. अशा स्थितीत आगामी महिन्यांत जीएसटी संकलनाच्या आकड्यात आणखी वाढ पाहायला मिळू शकते.

महिना वर्ष 2021 वर्ष 2022 वृद्धी (%) एप्रिल 1,39,708 1,67,540 19.9 मे 97,821 1,40,885 44.0 जून 92,800 1,44,616 55.8 जुलै 1,16,393 1,48,995 28.0 (आकडे कोटी रु.)

बातम्या आणखी आहेत...