आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकारने २८ माेस्ट वाँटेड गँगस्टर्सची एक यादी तयार केली आहे. हे गँगस्टर्स १४ देशांत सक्रिय आहेत. त्यापैकी नऊ कॅनडात, ५ अमेरिकेत दडून बसले आहेत. पंजाबी गायक मुसेवालाच्या हत्येमधील आराेपी सतिंदरजीत सिंग ऊर्फ गाेल्डी ब्रारसह इतरांच्या विराेधात हत्या, खंडणी, अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत.
वाँटेड श्रेणीतील गँगस्टर अनमाेल बिश्नाेई अमेरिकेत आहे. कॅनडात राहणाऱ्या नऊ आराेपींमध्ये सुखदूल सिंह, गुरपिंदर, सतवीर सिंह, स्नाेवर ढिल्लाे, लखबीर सिंग, अर्शदीप सिंग, चरणजीत सिंग, रमनदीप, गगनदीपचा समावेश आहे.
गोल्डी ब्रार अमेरिकेत लपलेला
एनआयएच्या म्हणण्यानुसार, गोल्डी ब्रार अमेरिकेतच लपला आहे. बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) चालवणाऱ्या लखबीर सिंग उर्फ लंडा याच्याशी गोल्डी ब्रारचा थेट संबंध आहे. लंडावर मोहाली आणि तरन तारणमध्ये रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड (RPG) हल्ल्यांचे आयोजन केल्याचा आरोप आहे.
लॉरेन्सचा भाऊ आणि भाचाही यादीत
या यादीत कुख्यात गँगस्टर लॉरेन्सचा भाऊ अनमोल आणि भाचा सचिन थापनचाही समावेश आहे. अनमोल अमेरिकेत तर सचिन थापन अझरबैजानमध्ये लपला आहे. अमेरिकेत लपून बसलेला अनमोल भारतातील त्याच्या गुंडांकडून वसुली करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तो मुख्यतः चित्रपट स्टार, गायक आणि व्यावसायिकांना लक्ष्य करतो आणि गुन्हेगारी कट रचतो. त्याचे पाकिस्तानशी संबंध असल्याचाही आरोप आहे. काही दिवसांपूर्वी अनमोलला दुबईत तर सचिनला अझरबैजानमध्ये ताब्यात घेतल्याची बातमी समोर आली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.