आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केरळ विधानसभा निवडणुकीत नवा इतिहास िलहिण्यात आला. पहिल्यांदाच निवडणुकीत ट्रान्सजेंडर मैदानात आहे. अनन्या कुमारी एलेक्सला डेमाेक्रॅकिट साेशल जस्टिस पार्टीने (डीएसजेपी) तिकीट दिले आहे. अन्नायाह सामान्य मतदारसंघातून नव्हे तर मुस्लिम लीगचा गड मालाप्पुरमच्या वेंगरा मतदारसंघातून निवडणूक लढत आहे. या मतदारसंघात त्या मुस्लिम लीगचे िदग्गज नेते पी.के. कुन्हाली कुट्टी यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत.दाेन वर्षांपूर्वी अनन्याच्या नावे एक विक्रम हाेता. तेव्हा त्या राज्यातील पहिले रेडिआे जाॅकी बनल्या हाेत्या. आता त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला. वय केवळ २८ वर्षे आहे. एलेक्स म्हणाल्या, प्रचाराची पूर्वतयारी केली आहे.
आता माेठ्या सभाही हाेतील. एक ट्रान्सजेंडर या नात्याने मी लाेकांना मत मागणार आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी चांगले काम करून दाखवेल. राजकारणात प्रवेश करायचा हे कधी ठरवले? असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, काही दिवसांपूर्वीच हे ठरवले. माझ्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे वाटते. मी जिंकले तर सर्वांना समान वागणूक देणे ही माझ्यासाठी माेठी जबाबदारी असेल. लिंग, जात-धर्माच्या आधारे वागवणार नाही. विजय झाल्यास महिला सुरक्षा, शिक्षण, अल्पसंख्याक त्यातही ट्रान्सजेंडर यांच्यासाठी प्रत्येक क्षेत्रात आरक्षणासाठी प्रयत्न करणार आहे.
ट्रान्सजेंडरच्या सुरक्षेसाठी काम करेल. यूडीएफचे वेंगरातील उमेदवार कुट्टी ट्रबलशूटर आहेत. २०११ व २०१६ मध्ये ते आमदार हाेते. २०१७ मध्ये मुस्लिम लीगचे अध्यक्ष ई अहमद यांच्या निधनानंतर मालाप्पुरम लाेकसभा जागेवर ते पाेटनिवडणुकीत उतरले आणि विजयी झाले. २०१९ मध्ये ते पुन्हा खासदार झाले. परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी राजीनामा दिला. वेंगरात पुन्हा ते मैदानात आहेत. वेंगरामध्ये १.८२ मतदार आहेत. त्यापैकी सुमारे ७० टक्के मुस्लिम आहेत.
जनता योग्य व्यक्ती निवडेल
विजयन सरकार कसे काम करतेय? यावर अनन्या म्हणाल्या, त्यांची काही कामे चांगली आहेत. काही चुुकीची. यंदा सरकार काेणाचे येईल? त्यावर जनता याेग्य व्यक्तीची निवड करेल, असे त्यांनी सांगितले. केरळमध्ये लव्ह जिहादचा मुद्दा आहे. त्यावर अनन्या म्हणाल्या, याबद्दल बाेलण्यासाठी मी याेग्य व्यक्ती नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.