आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 28178 Patients Increased In 24 Hours, 9.07 Lakh Cases So Far In The Country, More Than 1100 Infected In Bihar On Second Day, Verdict On Lockdown Today

कोरोना देश:संक्रमितांचा आकडा 9.34 लाखांवर; देशात उंदीर आणि सशावर दोन व्हॅक्सीनचे परीक्षण झाले, या महिन्याच्या अखेरपर्यंत मानवी परीक्षण सुरू होईल

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो दिल्लीच्या एलएनजेपी हॉस्पिटलमधील आहे.

देशातील संक्रमितांची संख्या 9 लाख 34 हजार 565 झाली आहे. आतापर्यंत 5 लाख 90 हजार 993 लोक ठीक झाले आहेत, तर 3 लाख 18 हजार 882 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच, आतापर्यंत 24 हजार 301 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

दरम्यान, इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने चांगली बातमी दिली आहे. मंगळवारी काउंसिल के डायरेक्टर जनरल बलराम भार्गव यांनी सांगितले की, देशात सध्या कोरोनाच्या दोन व्हॅक्सीनवर काम सुरू आहे. याचे उंदीर आणि सशांवर परीक्षण झाले आहे. संशोधकांनी याची रिपोर्ट डायरेक्टर जनरल हेल्थला दिली आहे. ही रिपोर्ट पास झाल्यावर या महिन्याच्या अखेरपर्यंत मानवी चाचणी सुरू केली जाईल.

रिकव्हरी रेट 63% झाला

आयसीएमआरने सांगितले की, मे महिन्यात रुग्णांचा रिकव्हरी रेट 26% होता, आता हा 63 % झाला आहे. म्हणजेच प्रत्येक 100 रुग्णांपैकी 63 रुग्ण ठीक होत आहेत. चांगली बाब म्हणजे, 20 राज्यांचा रिकव्हरी रेट देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा चांगला आहे.

बिहारमध्ये लॉकडाऊन वाढवला

बिहारमध्ये कोरोना संसर्गाचा आलेख वेगाने वाढत आहे. सोमवारी, 1116 नव्याने संक्रमित रूग्णांची ओळख पटली आहे. रविवारी बिहारमध्ये 1266 संक्रमित लोक आढळले. कोविड -19 संसर्गाचे वाढते प्रकरणं लक्षात घेता राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते. लॉकडाऊन संदर्भात मंगळवारी क्राइसिस मॅनेजमेंट ग्रुपची बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.