आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवान:भारतीय लष्करात 288 नवे जवान सामील ; भारत-चीन सीमेवरून भारतीय जवान बेपत्ता

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय लष्कराला शनिवारी २८८ नवे जवान मिळाले. शनिवारी भारतीय सैन्य अकादमीच्या कॅडेट्स पासिंग आउट परेडमध्ये ३७७ कॅडेट्स सहभागी झाले होते. त्यात अफगाणचे ४३ यासह आठ मित्र राष्ट्रांचे ८९ कॅडेट्सही उत्तीर्ण झाले.

जम्मूतील चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यातील चकमकीत हिजबुल मुजाहिदीनच्या एका दहशतवाद्याचा खात्मा झाला. या भागात इतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. खबरदारी म्हणून वाहतुकीचे सर्व मार्ग बंद ठेवण्यात आले आहेत. दहशतवादी दिसून आल्याची माहिती मिळाल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली होती.

‘पंजाबात कायदा- सुव्यवस्था बिघडली’ आम आदमी पार्टीच्या सत्ताकाळात पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्याचा आरोप हिमाचल प्रदेश भाजपने केला आहे. हिमाचल प्रदेशातील हमीरपूर येथे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा झाली. त्यात केजरीवाल यांनी आगामी विधानसभेत मतदान करण्याचे आवाहन केले होते.

भारत-चीन सीमेवरून भारतीय जवान बेपत्ता अरुणाचल प्रदेशात भारत-चीन सीमेवरून एक भारतीय जवान बेपत्ता झाला आहे. गेल्या तेरा दिवसांपासून हा जवान बेपत्ता आहे. त्यामुळे जवानाच्या कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. प्रकाशसिंग राणा असे जवानाचे नाव असून तो २९ मे रोजी बेपत्ता झाला. हा जवान सातव्या गढवाल रायफल्समध्ये होता. तो मूळचा रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखिमाठ येथील रहिवासी आहे.

बातम्या आणखी आहेत...