आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 29 Crore Leased From A Blacklisted Company; The Company Against Which Action Was Taken In Maharashtra, Was Contracted In Bihar; News And Live Updates

घोटाळा:काळ्या यादीतील कंपनीकडून व्हॅन घेतल्या 29 कोटींत भाडेकराराने; ज्या कंपनीवर महाराष्ट्रात कारवाई, तिला बिहारमध्ये कंत्राट

पाटणा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोबाइल वाहनांद्वारे तपासणीचा रोज ३२.४५ लाखांचा खर्च

लखनऊची कंपनी पीओसिटी सर्व्हिसेसला बिहार सरकारने कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासणीसाठी मोबाइल व्हॅनचे कंत्राट दिले आहे. तर महाराष्ट्र सरकारने या कंपनीला आरटीपीसीआर तपासणी किट पुरवठा प्रकरणात सप्टेंबर २०२० मध्ये तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. बिहारमध्ये या कंपनीला पाच मोबाइल व्हॅन चालवण्यासाठी पाटणा, मुझफ्फरपूर, भागलपूर, गया आणि बिहारशरीफच्या रुग्णालयांना जोडले आहे. प्रत्येक व्हॅनला रोज पाच हजार तपासण्या करायच्या आहेत. कंपनीला ९० दिवसांसाठी २९.२० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मोबाइल व्हॅनमध्ये आरटीपीसीआर तपासणीची यंत्रणा लावण्यासाठी एका व्हॅनला दोन कोटी रुपये खर्च येईल.

अशा प्रकारे १० कोटी रुपयांत पाच व्हॅन तयार होऊ शकतात. सरकारला दोनशे ते तीनशे रुपयांत आरटीपीसीआर तपासणी किट मिळते. म्हणजे पाचही व्हॅनद्वारे तीन महिन्यांत साडेचार लाख तपासण्या करण्यासाठी सुमारे ९ ते १० कोटी रुपये खर्च येईल. तसेच एक कोटी रुपयांत तीन महिन्यांसाठी मनुष्यबळ, इंधन आदींचा खर्च सहज करता येऊ शकतो. म्हणजे २० कोटी रुपयांत पूर्ण यंत्रणा उभी राहील आणि तीन महिन्यांत साडेचार लाख तपासण्याही पूर्ण होतील. मोबाइल टेस्टिंग व्हॅनचे काम समाधानकारक नसल्याने भागलपूरचे जिल्हा शल्यचिकित्सक उमेश शर्मा यांनी आरोग्य विभागाला पत्र लिहिले आहे. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून १८०० तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. कंपनीची माणसे ठरल्याप्रमाणे तपासण्याही करत नाहीत व अहवालही देत नाहीत.

राजधानी पाटण्यातही टेस्टिंग व्हॅनचे काम समाधानकारक नाही. आतापर्यंत फक्त ५८०० नमुनेच गोळा करण्यात आले आहेत. गयात ८१०१, बिहारशरीफ ९२८५ लोकांचे नमुने घेतले आहेत. कोविड तपासणीसाठी टेस्टिंग व्हॅनमध्ये आवश्यक ते साहित्य संस्थेने द्यायचे आहेत. नमुना घेतल्यानंतर टेस्टिंग व्हॅनमधील रिअल टाइम आरटीपीसीआर यंत्राद्वारे रिअल टाइम आरटीपीसीआर तपासणी संबंधित वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय परिसरात केली जाईल. मोबाइल टेस्टिंग व्हॅनद्वारे होणाऱ्या तपासण्या जिल्ह्यासाठी ठरवून दिलेल्या आरटीपीसीआरच्या रोजच्या लक्ष्याशी जोडण्याचीही अट आहे. जर एखाद्या दिवशी टेस्टिंग व्हॅनद्वारे निर्धारित लक्ष्यापेक्षा कमी नमुने गोळा झाले तर जिल्ह्याने गोळा केलेल्या नमुन्यातून त्याची भरपाई केली जाईल. सरकार कंपनीला एका तपासणीसाठी ६४९ रुपये देत आहे.

रोज ९०० तपासण्या आवश्यक, होताहेत सरासरी फक्त ३६५
पाच व्हॅनला रोजचे प्रत्येकी एक हजार तपासण्यांचे उद्दिष्ट दिले आहे. बीएमएसआयसीएलसोबत झालेल्या करारांतर्गत रोज १ हजार तपासण्यांपैकी कमीत कमी ९०% म्हणजे ९०० तपासण्या आवश्यक आहेत. सर्व जिल्ह्यांचे आकडे बघता १४ जूनपर्यंत ३१ हजार तपासण्या झाल्या आहेत. म्हणजे प्रत्येक व्हॅन सरासरी ३६५ तपासण्या करत आहे.

मोबाइल वाहनांद्वारे तपासणीचा रोज ३२.४५ लाखांचा खर्च
या व्हॅनमुळे तपासणीचा वेग वाढला नाही. करारानुसार २४ तासांत अहवाल द्यायचा असतानाही हजारो नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. ५ व्हॅनसाठी १ दिवसाचा खर्च ३२ लाख ४५ हजार आहे. २८ मे ते २ ऑगस्टपर्यंत ९० दिवसांसाठी ही सोय करण्यात आली आहे.