आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळशाचे उत्पादन:एप्रिलमध्ये कोळशाच्या उत्पादनात 29 % वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एप्रिलमध्ये देशातील कोळशाचे उत्पादन २९ टक्क्यांनी वाढून ६६.५८ दशलक्ष टन झाले आहे. कोरड्या इंधनाच्या तुटवड्यासह विविध कारणांमुळे देशावर विजेचे संकट आलेले असताना उत्पादन वाढले असल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले.

कोळसा मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या एप्रिलमध्ये देशातील कोळशाचे उत्पादन ५१.६२ दशलक्ष टन इतके झाले आहे. वीज उपयोगितांना कोळसा पाठवण्याचे प्रमाण १८.१५ टक्क्यांनी वाढून ६१.८१ दशलक्ष टन झाले असल्याचे सरकारच्या निवेदनात म्हटले आहे.

अव्वल ३७ कोळसा उत्पादक खाणींपैकी २२ खाणींनी १०० टक्क्यांपेक्षा जास्त चांगली कामगिरी केली आहे तर इतर १० खाणींमधील उत्पादन ८० ते १०० टक्क्यांच्या दरम्यान आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीपासून आयात कोळशाच्या किमतीत घट दिसून आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय किमती अजूनही उच्च पातळीवर आहेत, असे काेळसा मंत्रालयाने म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...