आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 2G Network App Developed By IIT Mumbai Students, With The Help Of Which 3000 Teachers Are Teaching Children Online

नवोन्मेष:आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनवले 2 जी नेटवर्कवर चालणारे अॅप, त्याच्या मदतीने 3000 शिक्षक मुलांना ऑनलाइन शिकवताहेत

मुदस्सीर कुल्लू | श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॉइस अॅप बनवणारा मुबीद मसुदी
  • आता जम्मू-काश्मीरमध्ये मुलांच्या ऑनलाइन शिक्षणात 2 जीच्या स्लो नेटवर्कची अडचण येणार नाही

काश्मिरी विद्यार्थी एक-दीड वर्षापासून शाळेत जाऊ शकलेले नाहीत. कलम ३७० रद्द केल्यानंतर खोऱ्यात शांतता निर्माण करण्यासाठी अनेक निर्बंध लावण्यात आले होते आणि मोबाइल नेटवर्कही बंद करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनामुळे काश्मीर खोऱ्यात पुन्हा लॉकडाऊन झाले. तिथे सध्या २ जी नेटवर्क सुरू आहे. त्यात ऑनलाइन शिक्षण घेण्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. आयआयटी मुंबईचे विद्यार्थी बिलाल अबिदी आणि मुबीद मसुदी यांनी त्यावर तोडगा काढला आहे. बिलाल लखनऊचा तर मुबीद काश्मीरचा आहे. मुबीदने सांगितले,‘खोऱ्यात मुलांचे शिक्षण एक-दीड वर्षापासून बंद आहे. २ जी नेटवर्कमध्ये त्यांचे ऑनलाइन शिक्षण व्यवस्थित होऊ शकत नाही. आता त्यांना बोर्डाची परीक्षा द्यावी लागेल. त्यामुळेच २ जी नेटवर्कवर सहजपणे चालणारे ऑनलाइन क्लासरूम अॅप बनवण्याची कल्पना सुचली. त्यावर आम्ही सलग दोन महिने काम केले. अखेर एक व्हॉइस अॅप तयार करण्यात यश मिळाले. त्यात एकाच वेळी असंख्य लोक जोडले जाऊ शकतात. झूमप्रमाणे आयडी आणि पासवर्डचीही गरज भासत नाही. खोऱ्यात ३००० पेक्षा जास्त शिक्षक या अॅपच्या मदतीने मुलांना शिकवत आहेत. एवढेच नव्हेत तर विदेशात राहणारे काही काश्मिरी विद्यार्थीही मुलांना ऑनलाइन शिकवत आहेत.

१२ वीचा विद्यार्थी फैजान अहमद म्हणाला की, आधी कलम ३७० रद्द केल्यामुळे लादलेले निर्बंध आणि नंतर कोरोनामुळे आमचे शिक्षण बंद झाले आहेत. पण आता व्हॉइस अॅपच्या मदतीने अभ्यास सहजपणे करत आहोत. हे अॅप स्लो नेटवर्कमध्ये चांगले काम करते. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही अॅप बनवणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रशंसा केली आहे.

व्हर्च्युअल क्लासरूमसारखा अनुभव, नोट्सही शेअर करू शकता

व्हॉइस अॅप बनवणाऱ्या मुबीद मसुदीने सांगितले,‘हे व्हॉइस अॅप वापरणे खूप सोपे आहे. एका ‌वेळी असंख्य लोक त्याच्याशी जोडले जाऊ शकतात. या प्लॅटफॉर्मवर मुलांना, शिक्षकांना व्हर्च्युअल क्लासरूमसारखा अनुभव येतो. अॅपच्या मदतीने शिक्षक असाइनमेंट देऊ शकतात आणि प्राप्त करू शकतात. नोट्स शेअर करू शकतात. ते पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑफलाइनही शिकता येऊ शकते. एवढेच नाही तर हे अॅप क्लासशी जोडल्या जाणाऱ्या मुलांची हजेरीही लावते.