आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्थिक सर्वेक्षण २०२१-२२ नुसार, भारत स्टार्टअपसाठी जगातील तिसरे मोठे इकोसिस्टम ठरले आहे. देशात सुमारे ५० हजार स्टार्टअप कार्यरत आहेत. या आकडेवारीवरून स्टार्टअप सुरू करण्यासाठी ही अनुकूल वेळ असल्याचे कळते. पण कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या-त्या क्षेत्राचे ज्ञान महत्त्वाचे असते. यश कसं मिळवायचं या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी पुस्तकांपेक्षा चांगले साधन कोणतेच नाही. येथे तीन पुस्तकांची माहिती देण्यात आली आहे, त्यातून तुम्ही तुमच्या स्टार्टअपला चांगल्या स्थितीत नेऊ शकता.
-मास्टरी : रॉबर्ट ग्रीनचे पुस्तक सांगते की, तुम्ही तुमची नोकरी कधी सोडू शकता आणि तुमचा स्वतःचा व्यवसाय कधी सुरू करू शकता. या व्यतिरिक्त, तुम्ही वैयक्तिक विकास तसेच व्यवसायातील यशाबद्दल जाणून घेऊ शकता.
-दी हार्ड थिंग अबाउट हार्ड थिंग्ज : बेन हॉरोविट्झ यांनी लिहिलेले हे पुस्तक, स्टार्टअप सुरू केल्यानंतर आपल्याला दररोज येणाऱ्या आव्हानांचे स्पष्टीकरणाविषयी आहे. तसेच त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग देण्यात आले आहे.
-कनेक्ट दी डॉट्स : या पुस्तकात रश्मी बन्सल यांनी अशा २० उद्योजकांची कहाणी सांगितली, ज्यांना कोणत्याही विशेष पदवीशिवाय त्यांच्या व्यवसायात यश मिळाले. तुमची आवड कशी फॉलो करायची हेही तुम्ही या पुस्तकातून समजू शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.