आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापश्चिम बंगालमध्ये पोलिसांनी झारखंडमधील काँग्रेसच्या तीन आमदारांना प्रचंड रोख रकमेसह ताब्यात घेतले. जामताडाचे आमदार इरफान अन्सारी, सिमडेगाचे नमन विक्सल कोंगाडी आणि खिजरीचे आमदार राजेश कच्छप यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. त्यांच्या वाहनात एवढी रोख रक्कम मिळाली की ती मोजण्यासाठी पोलिसांना यंत्रच मागवावे लागले.
हे तिन्ही आमदार इरफान अन्सारी यांच्या वाहनाने पूर्व मिदनापूरकडे जात होते. शनिवारी सायंकाळी त्यांचे वाहन रानीहाटी पांचला ठाणे भागात रानीहाटी वळणाजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी वाहनाची झडती घ्यायची आहे असे सांगितल्यानंतर इरफान यांनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर पोलिसांनी कठोर भूमिका घेत तपासणी केली तेव्हा वाहनात प्रचंड प्रमाणात रोकड मिळाली. हावडा ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक स्वाती भंगालिया घटनास्थळी आल्या. त्यांनी सांगितले की, एका वाहनात प्रचंड प्रमाणात रोकड नेली जात आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर तपास मोहीम हाती घेण्यात आली. त्यादरम्यान जामताडाकडून येत असलेले एक वाहन रोखण्यात आले. वाहनात चालकासह पाच जण होते. त्यात झारखंडमधील काँग्रेसचे तीन आमदार होते. वाहनात बेहिशेबी रोख रक्कम मिळाली. आमदारांची चौकशी सुरू आहे. वाहनावर जामताडाच्या आमदाराचा फलक लावलेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.