आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Feet Bridegroom, 3 Feet Groom | The Auspicious Marriage | The Crowd Of People Gathered In The Wedding Ceremony

3 फुटांची नवरी, 3 फुटांचा नवरदेव:मोठ्या धुमधडाक्यात शुभमंगल विवाह संपन्न, अनोखे लग्न पाहण्यासाठी लोकांची गर्दी

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जात असतात असे म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय सीतामढीमधील लोकांना आला आहे. 3 फुट उंचीचा नवरा आणि ३ इंच उंचीची नवरी यांचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला. दोघांच्या उंचीमुळे हा विवाह चर्चेचा विषय राहिला आहे.

रविवारी हा विवाहसोहळा पार पडला. दोघांचे लग्न पुनौरा धाममध्ये मोठ्या थाटामाटात झाले. दोघांच्या या अनोख्या लग्नाची जिल्हाभर चर्चा होत आहे. दोघांची उंची कमी असल्याने ही जोडी देवानेच बनवली असल्याचे म्हटले जात आहे. अशा परिस्थितीत काल रात्री पुनौरा धाम येथे हिंदू रितीरिवाजांनुसार मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला आहे.

32 वर्षांचा नवरदेव... 21 वर्षांची वधू

पूजा कुमारी ही वधू सीतामढी शहरातील लोहिया नगर मेला रोड येथील रहिवासी सुरेश महतो यांची मुलगी आहे. तिचे वय सुमारे 21 वर्षे आहे. उंची केवळ तीन फुटच वाढल्याने सुरेश महतो यांना आपल्या मुलीच्या लग्नाची चांगलीच चिंता लागली होती. कारण एवढ्या कमी उंचीच्या मुलीसोबत कोण लग्न करणार, असा प्रश्न त्यांना निर्माण झाला होता. तर दुसरीकडे सीतामढीच्या डुमरा ब्लॉकच्या रामपूर परोरी गावातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय योगेंद्रचे विवाहाचे वय वाढत असताना त्याच्या उंचीची मुलगी मिळत नसल्याने त्याचा विवाह होईल किंवा नाही अशी चिंता कुटुंबाला लागली होती. पण, अखेर रविवारी सीतामढी शहरातील पुनौरा धाम येथे वधू-वरांच्या कुटुंबियांसमोर दोघांनी लग्न केले.

लग्न पाहण्यासाठी गर्दी जमली

मिळालेल्या माहितीनुसार, 3 फूट वधू पूजालाही लग्नासाठी मुलगा शोधण्यात अडचणी येत होत्या. तर 32 वर्षीय योगेंद्रही आपल्या जीवनसाथीच्या शोधात होता. अशा परिस्थितीत सर्व रितीरिवाजांसह दोन्ही कुटुंबातील लोकांनी आनंदाने दोघांचे लग्न लावून दिले. दोघांचे अनोखे लग्न पाहण्यासाठी आजूबाजूच्या लोकांनीही मोठी गर्दी केली होती. या जोडप्यासह सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली होती.

3 फूट उंचीच्या अझीम मन्सूरींच लग्न

अखेर शामली येथील 3 फूट अजीम मन्सूरी यांचे आज लग्न झाले आहे. अझीम यांचे वर्षानुवर्षेचे स्वप्न साकार झाले असून त्यांना आपल्या स्वप्नांची राणी मिळाली आहे. अझीम यांचा विवाह हापूर येथील बुशरासोबत झाला. बुशराची उंचीही 3 फूट आहे. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप आनंदात असून लग्नानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...