आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Ideologies Of The Freedom Movement Mahatma Gandhi, Bhagat Singh And Subhas Chandra Bose; Know From His Thoughts How India Wanted The Leaders Of Revolution

भारत एक स्वप्न:स्वातंत्र्य चळवळीच्या 3 विचारसरणी महात्मा गांधी, भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस; त्याच्या विचारातून जाणून घ्या की क्रांतीच्या प्रणेत्यांना कसा भारत हवा होता

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजी: असा देश असावा, जेथे प्रत्येक गाव स्वावलंबी असावे

म हात्मा गांधी भारत लोकशाहीस पात्र नाही, या इंग्रजांच्या प्रचाराच्या विरोधात होते. भारतात वाद-संवाद आणि तर्कावर आधारित राज्य असावे असे त्यांना वाटायचे. भारतीय समाजाला तर्काबाबत सजग व सहज करण्यासाठी आवश्यक होते जात, धर्म, भाषा आणि प्रादेशिकतेवर विभागलेल्या भारतीय समाजाने अहिंसेचे पालन करावे म्हणजे वाद-संवादला जागा असेल.

नागरिक सतत निर्भय असावेत अशी त्यांची इच्छा होती. वाईटातील वाईट स्थितीतही आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत:ला मोकळेपणाची जाणीव व्हावी. १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनासाठी काँग्रेसमध्ये झालेल्या मतदानावेळी १३ सदस्यांनी विरोधात मतदान केले होते. गांधीजींनी त्यांचे अभिनंदन करत सांगितले, भीतीचा त्याग करून अापले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्यच भारताला बलशाली बनवू शकते.

भारत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे असावा मात्र नव्या तंत्रज्ञानामुळे कामगाराचे काम सोपे व्हावे, लोक बेरोजगार होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्यांना गावांना स्वावलंबी करायचे होते. त्यांची इच्छा होती की, देशातील प्रत्येक गाव आपली गरज पूर्ण करणे व प्रत्येकाला रोजगार देण्यात सक्षम असावे. गावांमध्ये शासकीय यंत्रणा असावी मात्र सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा असे त्यांचे म्हणणे होते.

भगतसिंग : सर्व शिक्षित व्हावेत, लोकांचे सरकार असावे

ला हाेर हायकोर्टात सुनावणीच्या वेळी भगतसिंग म्हणाले होते, क्रांतीच्या तलवारीला विचाररूपी दगडावरच धार लावता येऊ शकते. भगतसिंग त्या काळातील सर्वाधिक शिक्षित स्वातंत्र्यसेनानींपैकी एक म्हटले जायचे. सेनानींचे शिक्षण-प्रशिक्षण होत राहावे म्हणून लाहोरपासून आग्र्यापर्यंत त्यांनी वाचनालये सुरू केली होती.

कोणत्याही विचारसरणीला विरोध करण्याआधी स्वत:ला ज्ञानाच्या शस्त्राने सज्ज करावे, यावर त्यांचा विशेष भर होता. ज्याला तुम्ही विरोध करत आहात ती विचारसरणी समजून घ्या. विशेष म्हणजे एवढे शिक्षण त्यांनी वयाच्या १७ व्या वर्षी सुरू करून २३ व्या वर्षी फाशीवर जाण्याआधीच पूर्ण केले होते. त्यांना असा भारत हवा होता, जो ज्ञानमार्गी असावा म्हणजे ९८% लोकांचे ज्यांच्यावर सरकार व उद्योग चालवायची जबाबदारी आहे त्या २% लोकांवर राज्य असावे. ते भारताच्या वर्तमान व भवितव्यासाठी सांप्रदायिकता, जातीयवाद आणि मानवाच्या शोषणाच्या व्यवस्थेला सर्वात मोठा धोका म्हणायचे. त्यांचे म्हणणे होते की, इंग्रजांची सत्ता देशातून गेल्यानंतरही क्रांती थांबू शकत नाही. जेव्हा देश सांप्रदायिकता व जातीयवादापासून मुक्त होईल तेव्हाच ही क्रांती पूर्ण होईल. यासाठी प्रत्येक नागरिक पूर्णपणे शिक्षित होणे गरजेचे असल्याचे ते म्हणायचे.

सुभाषचंद्र बोस : शत्रूने देशाकडे वाकडा डोळा करू नये

ने ताजी सुभाषचंद्र बोस देशातील अंतर्गत मुद्द्यांवर गांधीजींच्या अहिंसेच्या बाजूने होते. ते पहिले व्यक्ती होते, ज्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हटले होते. स्वतंत्र देशात लोकांना हाती शस्त्र घ्यावे लागू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांची इच्छा होती की, भारत एक असा समाजवादी लोकशाही देश असावा, ज्यात अन्यायाला थारा नसावा. एक असा शक्तिशाली देश, जो मित्रांना शांततेने आकर्षित तर करेलच, मात्र शत्रूंना डोळे वर करण्याची संधी देणार नाही. भारताचे लष्करी बळ जागतिक दर्जाचे असावे अशी त्यांची इच्छा होती. ते एक वास्तववादी नेते होते, जे देशहितासाठी शत्रूच्या शत्रूशी मैत्री करण्यात मागेपुढे पाहत नव्हते. आर्थिक विकास न्यायपूर्ण असावा असे त्यांना वाटायचे. या ध्येयप्राप्तीत त्यांना रूढिवाद सर्वात मोठा अडथळा वाटायचा. त्यांचे म्हणणे होते की, रूढिवाद तोडण्यासाठी महिला सशक्तीकरण सर्वात आवश्यक आहे. यासाठी महिलांना कोणत्याही अटींशिवाय सैन्यासह प्रत्येक क्षेत्रात पुढे येण्याची सोय करणे अावश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

त्यांची घोषणा जयहिंद होती आणि त्यांचे म्हणणे होते की, सर्वार्थांनी जयहिंद तेव्हाच होईल जेव्हा बाह्यशक्तींविरोधात भारतीय समाज कोणत्याही स्थितीत एकजूट राहावा, शस्त्रांचा वापरही शास्त्रीय असावा आणि महिलांना सशक्त केले पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...