आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधावत्या बसला वीजेचा धक्का लागून 2 भावांसह 3 भाविकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत 8 जण होरपळलेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वीजेच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे हा अपघात घडला. त्यावेळी बसच्या छतावरही काही प्रवाशी बसले होते. त्यांनी जिवाच्या आकांताने धावत्या बसून रस्त्यावर उड्या मारल्या.
जैसलमेर जिल्ह्यातील पोलजीच्या डेयरी गावालगत मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास हा अपघात घडला. खींया व खूईयाला गावचे काही ग्रामस्थ एका खासगी बसमधून संत सदाराम यात्रेला गेले होते. तेथून परत येताना काही जण बसच्या छतावर बसले. ते डेयरी गावालगत रस्त्यावर लोंबकळणाऱ्या तारांच्या संपर्कात आल्याने होरपळले. या अनपेक्षित घटनेनंतर काहींनी धावत्या बसमधू रस्त्यावर उड्या मारल्या. त्यातही काहीजण जखमी झाले.
या अपघातानंतर घटनास्थळी मोठी आरडाओरड झाली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने जखमींना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लोंबकळणाऱ्या तारांमुळे अपघात
अपघातस्थळी रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ता उंच झाल्यामुळे वीजेचे तार खाली आलेत. कदाचित बस चालकाला त्याचा अंदाज आला नसेल. यामुळे बसच्या छतावर बसलेले प्रवाशी तारांच्या संपर्कात आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी शरीफ खान यांनी दिली. ग्रामस्थांनी या लोंबकळणाऱ्या तारांची अनेकदा महावितरणकडे तक्रार केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
बस अपघाताच्या चौकशीचे आदेश
जिल्हा परिवहन अधिकारी टीकूराम यांनी 56 सीटर बसचे सर्वच दस्तावेज उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. पण, सोबतच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचाही संशय व्यक्त केला आहे. 8 जखमी व होरपळलेले लोक बसच्या छतावर बसले होते. त्याचा तपास केला जात आहे, असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी प्रतिभा सिंह यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे स्पष्ट केले. मृत कुटूंबातील कमावते सदस्य होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.