आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट अयोध्या:मंदिरासाठी श्रम-धन जमा करणार 3 लाख गट; 11 लाख लोक जमणार

अयोध्या |प्रमोद त्रिवेदी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका मजल्याच्या शिळा तयार, राजस्थानात युद्धपातळीवर काम

अयोध्येतील राम मंदिर निर्माणाची स्थिती काय आहे याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. मंदिर बांधकामासंदर्भात ३ महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, तुम्हीही मंदिर बांधकामात मदत करू शकता, तुम्ही तुमच्या हाताने वीट लावू शकता, मजुरी करू शकता. यासाठी १५ जानेवारीपासून तीन लाख गट तुमची भेट घेण्यासाठी तुमच्या घरापर्यंत येतील. ११ कोटी लोकांना जोडण्याचे प्रयत्न आहेत. दुसरी, जेथे मंदिराचे बांधकाम होणार आहे तेथे २८० फूट खाेलीपर्यंत खडकाळ जमीन आढळलेली नाही. यामुळे मजबूत पायासाठी आयआयटी रुरकी व इतर संस्थांचे शास्त्रज्ञ व ४० हजार संघटनांशी संबंधित हजारो तज्ज्ञ या समस्येवर मार्ग शोधत आहेत. विशेषत: विक्रमादित्य काळातील वास्तुकलेवर संशोधन केले जात आहे. याच ठिकाणी विक्रमादित्यांनी बनवलेले मंदिर २५०० वर्षांपर्यंत टिकले होते. तिसरी गोष्ट, मंदिर बांधकामात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक शिळेची मोजणी होईल. यासाठी कारसेवकपुरममध्ये प्रत्येक शिळेवर क्रमांक आकडे टाकले जात आहेत. सध्या पाया तपासण्यासाठी १२ ट्रकमधून ३० क्रमांकापर्यंतच्या शिळा कारसेवकपुरमला पोहोचल्या आहेत. रामजन्म भूमी ट्रस्टचे वरिष्ठ विश्वस्त कमलेश्वर चौपाळ सांगतात की, अयोध्येत खाली खडकाळ जमीन नाही. त्यामुळे मंदिर खचण्याची भीती असल्याने माती परीक्षणासह भार तपासणीचेही काम सुरू आहे.

मंदिर बांधकामासाठी कारसेवकपुरममध्ये शिळांवर देखरेख ठेवणारे चंद्रशेखर सोमपुरा सांगतात की, मंदिराच्या पायापासून ते एक मजला तयार होईपर्यंतच्या ७५ हजार घनफुटांच्या शिळा तयार आहेत. उर्वरित दोन मजल्यांना लागणारा जवळपास सव्वातीन लाख घनफूट दगडही वेळेवर तयार होईल. राजस्थानातील सागबारा येथे शिळा काढण्याचे काम सतत सुरू आहे. सोमपुरा सांगतात की, प्रत्येक शिळेचा हिशेब ठेवला जात आहे. प्रत्येकावर क्रमांक टाकला जात आहे. यातून मंदिर बांधकामासाठी किती शिळा लागल्या हे समजेल. सध्या खांबांसाठी ज्या १२ ट्रक शिळा गेल्या आहेत त्या ३० क्रमांकापर्यंतच्या आहेत. खांबासाठी शिळा २५ घनफुटांच्या, तर इतर १० आणि ५ घनफुटांच्या आहेत. मंदिरात सिमंेटचा वापर होणार नाही.

कुणालाही करता येईल श्रमदान; संतांचा निर्णय
कमलेश्वर चौपाळ यांच्यानुसार नुकत्याच दिल्लीत झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीत मंदिर निर्माणाच्या संघर्षात आधीपासून असलेले आरएसएस, विहिंपसारख्या ४० संघटनांच्या मार्गदर्शक मंडळांदरम्यान पायाभरणीसंदर्भात चर्चा केली. या संघटनांमध्ये अनेक संत असून ते सतत आम्हाला मार्गदर्शन करतात. ज्या संघटना प्रत्येक स्थितीत आमच्यासोबत उभ्या राहिल्या त्या सर्व मोहीम सुरू करत आहेत. कोरोनामुळे आम्ही अजून मोहिमेला सुरुवात केलेली नाही. मात्र, १५ जानेवारीपासून आमची देशभरात मोहीम सुरू होईल. यात ११ कोटी लोकांना मंदिर निर्माणात जोडले जाईल. मंदिर निर्माणासाठी जे लोक तन, मन, धनाने सेवा करू इच्छितात त्यांना यात सहभागी होता येईल. यासाठी संपूर्ण देशात ३ लाख गट होतील. प्रत्येक गावात संपर्क साधला जाईल. शिळापूजनाच्या वेळी राहिलेल्या गावांचा समावेश करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...