आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्याचा खात्मा:शोपियानमध्ये 3 अतिरेक्यांना कंठस्नान, पैकी 1 अतिरेकी काश्मिरी पंडिताचा मारेकरी

काश्मीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये मंगळवारी सकाळी सुरक्षा दलाच्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे तीन अतिरेकी ठार झाले. त्यांच्याकडून एक एके-४७ आणि २ पिस्तूल जप्त केल्या. काश्मीरचे सहायक पोलिस उपमहासंचालक विजय कुमार म्हणाले, अतिरेक्यांची माहिती मिळाल्यानंतर शोपियानमधील जैनापोरा भागात नाकेबंदी करण्यात आली. ठार झालेल्या तीन अतिरेक्यांपैकी एकाची ओळख पटली आहे. त्याचा नागरिकांच्या हत्येत सहभाग होता. यापैकी एक लतीफ लोण शोपियानचा होता. तो कथितरित्या काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्टच्या हत्येत सामिल होता.

भट्टची पत्नी म्हणाली, आम्हाला न्याय मिळाला आहे. हे होणारच होते. कारण त्याने एका निर्दोष व्यक्तीला मारले होते. उल्लेखनीय म्हणजे या वर्षी ऑक्टोबरमध्ये शोपियानमधील चौदरीगुंड गावात भट्ट यांची अतिरेक्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती.

यापूर्वीही अनंतनागमध्ये एका अतिरेक्याचा खात्मा
२० नोव्हेंहर रोजी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा भागामध्ये शोध मोहिमेदरम्यान लश्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंधित सज्जाद तांत्रे नावाचा एक अतिरेकी चकमकीत ठार झाला होता.

बातम्या आणखी आहेत...