आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 More Fighter Jets Arrived From France, 24 So Far; Will Be Posted In Hasimara, Bengal​​​​​​; News And Live Updates

राफेल लढाऊ विमान:फ्रान्समधून राफेलची 7 वी तुकडी पोहोचली भारतात, 3 लढाऊ विमान दाखल; आतापर्यंत 24 विमान पोहोचले, बंगालमधील हासीमारीमध्ये तैनाती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या विमानाने केला 8 हजार किलोमीटरचा प्रवास

राफेल लढाऊ विमानांची 7 वी तुकडी बुधवारी रात्री भारतात पोहोचली. यामध्ये 3 विमान भारतीय सैन्यात दाखल झाले असून आता याची संख्या 24 वर पोहोचली आहे. या विमानाला पश्चिम बंगालमधील हासीमारीमध्ये तैनात करण्यात येणार आहे.

राफेलची पहिली स्क्वॉड्रन अंबाला वायू स्टेशनवर तैनात करण्यात आली आहे. एका स्क्वाड्रनमध्ये 18 लढाऊ विमान असतात. अंबालामध्ये तैनात असलेल्या पहिल्या स्क्वॉड्रॉननेही पूर्व लडाखमधील चीनच्या सीमेवर गस्त घालण्यास सुरवात केली आहे. जुलैच्या अखेरीस दुसर्‍या पथकाचे कामकाज सुरू होईल.

या विमानाने केला 8 हजार किलोमीटरचा प्रवास
राफेलच्या या तिन्ही विमानाने फ्रान्सहून उड्डाण केली असून न थांबता सुमारे 8 हजार किलोमीटरचे अंतर पार करत भारतात पोहोचले आहे. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) मधल्या मार्गाने एअरबस 330 मल्टी-रोल ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने या विमानांना हवेमध्ये इंधन भरले. भारतीय वायुसेनेने ट्विट केले की, 'तीन राफळे विमान फ्रान्समधील इसरेस एअर बेसवरून उड्डाण न थांबता भारतात पोहोचले आहेत. भारतीय वायुसेने हवाई मार्गाच्या मध्यभागी मदत पुरविल्याबद्दल हवाई दलाचे आभार मानते.

59 हजार कोटी रुपयांचा करार
भारताने 2016 मध्ये फ्रान्सकडून 59 हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. यामध्ये भारताने 36 विमानांची करार केला होता. दरम्यान, आतापर्यंत भारताला हे तीन विमान मिळून याची संख्या 24 वर पोहोचली आहे. तर उर्वरित विमान 2022 मध्ये भारतात पोहोचण्याची आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...