आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेचे कामकाज गुरुवारीही विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे होऊ शकले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी महागाई, बेरोजगारी, खाद्यपदार्थावरील जीएसटी आणि अग्निपथ योजनेला विरोध करत यावर चर्चा करण्याची मागणी केली. आम आदमी पार्टीसह अन्य विरोधी सदस्य हौद्यात उतरले. यामुळे सभागृहाचे कामकाज चार वेळा स्थगित केल्यानंतर दिवसभरासाठी तहकूब केले. काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला.
याआधी आम आदमी पार्टीचे सुशील कुमार, संदीप कुमार पाठक आणि अपक्ष अजितकुमार भुयान यांना सभागृहात अयोग्य वर्तणूक केल्याच्या आरोपावरून आठवड्याभरासाठी निलंबित केले. याआधी २३ सदस्यांना निलंबित केले आहे. या कारवाई विरोधात खासदारांनी संसद भवन परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे दिले. निलंबित होणाऱ्या खासदारांची संख्या २७ झाली. गुजरातमधील विषारी दारू बळींचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आपल्या पक्षाच्या सदस्यांना निलंबित केल्याचा आरोप आपने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.