आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 3 More Rafale To Come To India By This Evening, France Will Deliver All 36 Jets In Two Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वायुसेनेची शक्ती वाढणार:आज 7 हजार 364 किलोमीटरचा सलग प्रवास करुन फ्रांसमधून भारतात दाखल होणार 3 राफेल विमान

नवी दिल्ली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय हवाई दलाला आज संध्याकाळपर्यंत अजून तीन राफेल विमान मिळणार आहेत. तिन्ही राफेल फ्रांसमधून उड्डाण घेतल्यानंतर कुठेही न थांबता 7,364 किलोमीटरचा प्रवास करुन भारतात येणार. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे तिन्ही राफेल गुजरातच्या जामनगर एअरबेसवर लँड करतील. यांच्या येण्याने भारतातील राफेलची संख्या 8 होईल. पुढील 2 वर्षात फ्रांसमधून सर्व 36 राफेलची डिलीव्हरी होईल.

भारताने फ्रांससोबत 2016 मध्ये 58 हजार कोटींमध्ये 36 राफेल फायटर जेटचा करार केला होता. 36 पैकी 30 फायटर जेट्स आणि 6 ट्रेनिंग एअरक्राफ्ट असतील. ट्रेनर जेट्स टू सीटर असतील आणि यातही फायटर जेट्सप्रमाणे सर्व सुविधा देण्यात येतील.

हवेत इंधन भरले जाणार, यावेळी कोणताच हॉल्ट नाही

मिळालेल्या माहितीनुसार, राफेलसोबत हवेत इंधन भरणारे फ्रांसच्या एअरफोर्सचे स्पेशल जेटदेखील असेल. मागच्या वेळेस 29 जुलैला फ्रांसमधून 5 राफेल भारतात आले होते. तेव्हाही हवेतच इंधन भरण्यात आले होते. परंतू, तेव्हा पाच राफेलने फ्रांसच्या दासौ एविएशनमधून उड्डाण घेतल्यानंतर UAE मध्ये हॉल्ट घेतला होता. यावेळेस हॉल्ट घेतला जाणार नाही.

राफेलमध्ये परमाणू हल्ला करण्याची क्षमता

राफेल डीएच (टू-सीटर) आणि राफेल ईएच (सिंगल सीटर), दोन्ही विमान ट्विन इंजिन, डेल्टा-विंग, सेमी स्टील्थ कॅपेबिलिटीजसोबतच चौथ्या जनरेशनचे फायटर आहेत. या जेटमध्ये परमाणून हल्ला करण्याची क्षमता आहे. या फायटर जेटला रडार क्रॉस-सेक्शन आणि इन्फ्रा-रेड सिग्नेचरसोबत डिझाइन केले आहे. यात शक्तीशाली एम 88 इंजिन लावले आहे. राफेलमध्ये एक अॅडवांस्ड एवियोनिक्स सूटदेखील आहे. यात लावलेला रडार, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम आणि सेल्फ प्रोटेक्शन इक्विपमेंटचा खर्च एकूण विमानाच्या 30% आहे.