आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Terrorist Killed In Pulwama Clashes With Security Forces, 4 Terrorists Killed In 36 Hours | Marathi News

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराचे 3 दहशतवादी ठार:पुलवामामध्ये सुरक्षादलाशी झालेल्या चकमकीत ठार; 36 तासांत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये शनिवारी संध्याकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत ३ दहशतवादी ठार झाले आहेत. पुलवामाच्या द्रबगाम भागात 2-3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.

शनिवारी रात्री उशिरा एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला, तर इतर दोन दहशतवादी रविवारी सकाळी झालेल्या कारवाईत ठार झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी दोन्ही दहशतवाद्यांना घेरले होते, त्यानंतर एक दहशतवादी मारला गेला. घटनास्थळावरून दोन एके-47 रायफल, एक पिस्तूल आणि दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे.

स्थानिक होते सर्व दहशतवादी
IGP काश्मीर विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मारले गेलेले सर्व दहशतवादी स्थानिक होते आणि ते लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एकाचे नाव जुनैद शिरगोजरी असे असून तो १३ मे रोजी कॉन्स्टेबल रियाझ अहमद यांच्या हत्येमध्ये सामील होता. पुलवामा जिल्ह्यातील फाजील नजीर भट आणि इरफान मलिक अशी अन्य दोन दहशतवाद्यांची नावे आहेत.

36 तासांत 4 दहशतवादी ठार
खोऱ्यात गेल्या 36 तासांत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरच्या कुलगाममधील खांडीपोरा भागात शनिवारी सकाळी हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी मारला गेला. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे दोन दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

याआधी मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील याच भागात 24 तासांत सुरक्षा दलांनी तीन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार केले होते.

बातम्या आणखी आहेत...