आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3 Terrorists Killed In Jammu And Kashmir's Awantipora | Lashkar Commander Mukhtar Bhat Also Killed | Marathi News

जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये 3 दहशतवादी ठार:लष्कर कमांडर मुख्तार भटचा देखील खात्मा

जम्मू-काश्मीरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा, पुलवामा येथे सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये लष्कर कमांडर मुख्तार भटचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा मोठा साठाही जप्त केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे दहशतवादी सुरक्षा दलांच्या कॅम्पमध्ये आत्मघाती हल्ल्याची योजना आखत होते.

प्रत्युत्तरात दहशतवादी मारले गेले
काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले की, परिसरात काही दहशतवादी लपल्याची बातमी मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरक्षा दलांसह शोधमोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. टीमने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत 3 दहशतवादी ठार झाले आहेत.

यापूर्वी, मंगळवारी सकाळी अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजबिहाराच्या सेमथान भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान एका दहशतवाद्याने गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. अशाप्रकारे 1 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दोन चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले आहेत.

श्रीनगरमध्ये 3 हायब्रीड दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर पोलिसांनी मंगळवारी हरनंबलमध्ये 3 हायब्रीड दहशतवाद्यांना अटक केली. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून 10 किलो बकेट आयईडी आणि 2 ग्रेनेड जप्त केले आहेत. श्रीनगर पोलिसांनी सांगितले की बॉम्ब निकामी पथकाने रंगरेथ भागात आयईडी नष्ट केला. तसेच UAPA, शस्त्रास्त्र कायदा आणि स्फोटक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...