आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Year Old Girl Gang Raped In Delhi's Fatehpur Beri Area Critical Condition; 2 Accused Arrested

दिल्लीत 3 वर्षीय मुलीवर गँगरेप:आईला जंगलात रक्ताच्या थारोळ्यात आढळली, प्रकृती चिंताजनक; 2 आरोपींना अटक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण दिल्लीतील फतेहपूरबेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 3 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी रामनिवास पानिका (27) आणि शक्तीमान सिंह (22) या दोन आरोपींना अटक केली आहे. मुलगी घराबाहेर खेळत होती, असे सांगितले जात आहे. शेजारी राहणाऱ्या दोन्ही आरोपींनी तिला फूस लावून जंगलात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. मुलीला एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

शेजाऱ्याने मुलीला जंगलात जाताना पाहिले, 2 लोकही तिच्या मागे गेले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिला 3 वर्षांच्या मुलीला घेऊन फतेहपूरबेरी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली. शुक्रवारी सकाळपासून मुलगी बेपत्ता असल्याचे महिलेने सांगितले. शेजाऱ्याने सांगितले की, त्याने मुलीला डेरा गावातील जंगलात पाहिले होते. त्याने 2 जणांनाही जंगलाकडे जाताना पाहिले आहे. महिला जंगलात पोहोचली तेव्हा मुलगी जंगलात रडताना दिसली.

अटक केलेले दोन्ही आरोपी विवाहित
मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. आईने मुलीला विचारले असता ती रडतच राहिली. महिलेने हा सगळा प्रकार पतीला सांगितला. यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले. मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता गँगरेपचे प्रकरण समोर आले. यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपी विवाहित असून ते एका कचरा पुनर्वापर कंपनीत मदतनीस म्हणून काम करतात.

बातम्या आणखी आहेत...