आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीर उपनिरीक्षक भरती घोटाळा:हरियाणाच्या हॉटेलमध्ये 30 लाखांत प्रश्नपत्रिकेची विक्री

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरच्या उपनिरीक्षक भरती घोटाळ्यात सीबीआयने महत्त्वाचा दावा केला आहे. प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रकरणाची पटकथा हरियाणातील व्यक्तीने कर्नालमध्ये लिहिली होती. कर्नालजवळील हॉटेलमध्ये जम्मू-काश्मीरच्या या परीक्षेतील उमेदवारांना प्रश्नपत्रिका २० ते ३० लाख रुपयांत विकण्यात आली होती. ही बाब चव्हाट्यावर आल्यानंतर सीबीआयने मंगळवारी जम्मू, पंजाब व हरियाणातील सात ठिकाणांवर छापेमारी केली. कारवाईदरम्यान ४ जणांना अटक झाली. छापेमारीत त्यांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले. जम्मू-काश्मीर पोलिसांत ही लेखी परीक्षा २७ मार्च व निकाल ४ जून रोजी घोषित झाले होते. घोटाळ्याच्या आरोपानंतर सरकारने तपास समितीची स्थापना केली.

बातम्या आणखी आहेत...