आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 30 People Missing After Cloudburst In Kishtwar District Jammu Kashmir Latest News Update

जम्मू-काश्मीरमध्ये निसर्गाचा कहर:किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे 4 ठार, 30 ते 40 जण बेपत्ता; खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ढगफुटीमुळे किश्तवाडमध्ये सुमारे 9 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड्यातील होन्जार गावात ढगफुटी झाल्याची बातमी समोर येत आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, या घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून 30 ते 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसापासून देशात मुसळधार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, खराब हवामानामुळे पोलिस आणि लष्कराच्या जवानांना बचावाकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. जखमींना मदत पोहोचवण्यासाठी हवाई दलाची मदतही घेतली जात आहे. या दुर्घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जात आहे. यामध्ये मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किश्तवाड उपायुक्ताच्या माहितीनुसार, एसडीआरएफच्या टीमनेही यामध्ये पुढाकार घेतला असून बचावकार्य वेगात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटीमुळे किश्तवाडमध्ये सुमारे 9 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, या घटनेत आतापर्यंत 4 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बाकीचा शोध सुरु असल्याचे ते यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...