आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 30 Per Cent Cut In MPs' Salaries, Bill Passed In Lok Sabha, One Year Less Salary

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लाेकसभा:खासदारांच्या वेतनात 30 टक्क्यांची कपात, लोकसभेत विधेयक मंजूर, एक वर्ष कमी पगार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खासदारांच्या वेतनात एक वर्षासाठी ३० टक्के कपातीचे विधेयक मंगळवारी लोकसभेने मंजूर केले. या रकमेचा उपयोग काेरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर कामे करण्यासाठी केला जाईल.

लाेकसभेत संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन दुरुस्ती विधेयक २०२० आवाजी मतदानाने मंजूर झाले. हे विधेयक यापूर्वीच्या अध्यादेशाच्या जागी आणले आहे. या माध्यमातून खासदार वेतन, भत्ते आणि पेन्शन अधिनियम १९५४ मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. कोरोना काळात या अध्यादेशाला ६ एप्रिल रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली होती. आता ते लोकसभेत मंजूर झाले.

खासदार निधी निलंबित करण्यास अनेकांचा विराेध
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, खासदार निधी २ वर्षांसाठी निलंबित केला आहे. लोकांच्या मदतीसाठी काही कठोर निर्णय घेण्याची गरज होती. अमरावतीच्या खा. नवनीत राणांनी “आमचे पगार कापा, पण मतदारसंघ विकासासाठीच्या निधीत कपात करू नका,” ही विनंती केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser