आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 30% Reduction In CBSE Course, Chapters Related To Nationalism, Secularism And Citizenship Removed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभ्यासक्रमात 30% कपात:CBSE च्या 11 वीच्या अभ्यासक्रमातून धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवादासह नागरिकत्व डिलीट; 12 वीच्या कोर्समध्येही मोठा बदल

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्याशी संबंधित धडे सुद्धा हटवले

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशातील परिस्थिती पाहता CBSE बोर्डाने 9 वी ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात कपात घोषित केली आहे. मूळ संकल्पना अबाधित ठेवण्यासाठी जवळपास 30 टक्के भाग कमी करण्यात आला आहे. या कपातीने धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद अशा स्वरुपाचा भाग शैक्षणिक वर्षातून पूर्णपणे काढण्यात आला आहे. NCERT आणि CBSE बोर्डाच्या तज्ज्ञांच्या एका समितीने अभ्यासक्रम कपातीचा एक आराखडा तयार केला. त्यानंतर 9 वी ते 12 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तर यापेक्षा खालच्या अर्थात 8 वी आणि त्यापेक्षा कमी वर्गांचा अभ्यासक्रम आराखडा शाळांनी तयार करावा असे सांगण्यात आले आहे.

11 वीच्या अभ्यासक्रमात बदल

बोर्डाच्या या अभ्यासक्रम कपातीने 11 वीला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून भारताची संघराज्य पद्धती, राज्य सरकार, नागरिकत्व, राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्षता असे अभ्यास वगळण्यात आले आहेत. CBSE ने या पाठ्यक्रमांना अभ्यासक्रमातून एका वर्षासाठी काढले आहे.

12 वीच्या अभ्यासक्रमातून अनेक युनिट हटवले

सीबीएसईतर्फे करण्यात आलेल्या अभ्यासक्रम कपातीनुसार, 12 वीच्या विद्यार्थ्यांना आता भारतीय अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरुप, निती आयोग, जीएसटी असे विषय शिकवले जाणार नाहीत. यासोबतच संरक्षण, पर्यावरण, नैसर्गिक साधन संपत्तीशी संबंधित युनिट्स सुद्धा काढण्यात आले आहेत. भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ, श्रीलंका आणि म्यानमार यांच्याशी संबंधित धडे सुद्धा हटवण्यात आले आहेत.

केवळ 9 ते 12 वीच्या CBSE च्या विद्यार्थ्यांना फायदा

अभ्यासक्रमातील ही कपात एका शैक्षणिक वर्षापुरती मर्यादित राहील. सोबतच, अभ्यासक्रम कपातीचा फायदा 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळेल. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती जारी केली आहे. कोरोनामुळे शैक्षणिक वर्षांतील दिवस खूप कमी झाले आहेत. ऑगस्ट महिन्यापर्यंत शाळा उघडण्याची शक्यता नाही. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन क्लास सुद्धा सुरू केल्या आहेत. अशात विद्यार्थी आणि शिक्षकांसह पालक सुद्धा अभ्यासक्रम कमी करण्याच्या पक्षात आहेत.

बातम्या आणखी आहेत...