आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 30 Thousand Migrants From Myanmar To Mizoram; Data Made, Population Balance Crisis

एक्सक्लुझिव्ह:मिझोरामला म्यानमारचे 30 हजार स्थलांतरित; डेटा बनवला, लोकसंख्येच्या संतुलनावर संकट

सत्यनारायण मिश्र | गुवाहाटी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमारमध्ये लष्करी राजवटीच्या अत्याचारामुळे पीडित स्थलांतरितांचे भारतात लोंढे येत आहेत. ईशान्येतील मिझोराममध्ये सुमारे ३० हजारांहून जास्त स्थलांतरितांनी आश्रय घेतला आहे. मिझोराम सरकारने राज्यात आलेल्या म्यानमारच्या नागरिकांचा डेटा देखील तयार केला आहे. मिझाेराम सरकारने म्यानमारच्या सर्व स्थलांतरितांना विशेष ओळखपत्र दिले आहे. राज्य सरकारचे अधिकारी म्हणाले, या ओळखपत्रांचा वापर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी करता येणार नाही. मिझोरामची लोकसंख्या सुमारे साडेबारा लाख आहे. त्यातही ३० हजार म्यानमारचे स्थलांतरित आल्याने येथील लोकसंख्येचा समतोल ढळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मिझोरामच्या सुमारे १६० छावण्यांतील निगराणी वाढली आहे. त्यामुळे स्थलांतरितांना येथे वास्तव्य करता येणार नाही.

छावण्यांत म्यानमारमधील गत सरकारचे प्रतिनिधीही गेल्या वर्षी फेब्रुवारीत म्यानमारमध्ये सैन्याने सत्ता मिळवल्यानंतर घाबरलेल्या लोकांनी टिआऊ नदी ओलांडून मिझोराम गाठले. हे स्थलांतरित मूळचे म्यानमारच्या चीन प्रांतातील आहेत. या छावण्यांत म्यानमारच्या आँग स्यान स्यूकी यांच्या नेतृत्वाखालील मागील लोकशाही सरकारचे १४ लोकप्रतिनिधीही आहेत.

स्थलांतरितांमध्ये २२ हजारांवर महिला-मुले मिझोराममध्ये आलेल्या म्यानमारच्या स्थलांतरितांमध्ये चंफाई, सियाहा, लांग्तलाई, सेरछिप, सेतुआल जिल्ह्यांतील लोक १६० छावण्यांत आहेत. मिझोराममध्ये म्यानमारच्या ३० हजार स्थलांतरितांमध्ये ११ हजार ८०० मुले व १० हजार २०० महिला आहेत. राज्य सरकारने स्थलांतरितांसाठी आतापर्यंत सुमारे ८० लाख रुपये मंजूर केले आहेत.

मणिपूर : ८५ लोकांची सीमा ओलांडताना धरपकड अलीकडेच म्यानमारच्या सीमेजवळील मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात २० मुलांसह ८० म्यानमार नागरिकांना अटक केली गेली. नंतर त्यांना इंफाळमध्ये न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. भाजपच्या प्रदेश शाखेने म्यानमारहून आलेल्या लोकांना रोखण्याची मागणी केली आहे.

लोकसंख्येत घटीची चिंता मणिपूरमध्ये म्यानमारचे ५ हजार १० हजार नागरिक राहू लागले आहेत. त्यामुळे मैते व नागा या स्थानिक समुदायाला एक चिंता सतावू लागली आहे. स्थलांतरितांमुळे समुदायाचे संतुलन बिघडू शकते. बहुसंख्याक हिंदू मैतेची संख्या सातत्याने कमी होत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार मैते एकूण लोकसंख्येपैकी ५१ टक्के होते. १९७१ मध्ये ते ६६ टक्क्यांवर होते.

बातम्या आणखी आहेत...