आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 30 To 50 Per Cent Reduction In Wedding Expenses For Middle Class Families This Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बदल:मध्यमवर्गीय कुटुंबातील विवाहाच्या खर्चात यंदा 30 ते 50 टक्के कपात, 50% लग्नांत दागिने जुन्या दागिन्यांपासून

नवी दिल्ली / धर्मेन्द्रसिंह भदौरियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात पाहुण्यांच्या मर्यादित संख्येमुळे लोक लग्नांत कमी खर्च करत आहेत. टेंट आणि केटरिंगचा खर्चही कमी झाला आहे. देशात विवाह समारंभांची बाजारपेठ ४.५ लाख कोटी ते पाच कोटी रुपयांपर्यंत असेल, असा अंदाज आहे. देशातील अव्वल वेडिंग प्लानर कंपन्यांपैकी एक असलेल्या शीयर मॅनेजमेंट ग्रुप ऑफ कंपनीचे प्रमुख अजय प्रजापती यांनी सांगितले की, आधी जे विवाह समारंभ आंतरराष्ट्रीय विवाह स्थळांवर होत होते, ते आता देशातच होत आहेत. त्याचप्रमाणे जे लोक आधी देशात डेस्टिनेशन वेडिंगला प्राधान्य देत होते, ते स्थानिक स्तरावर विवाह करत आहेत. सध्या मोठ्या समारंभांत स्टार, गायक येत नाहीत. पाहुण्यांची संख्या कमी असल्याने हॉटेल-रिसॉर्टमध्येच विवाह होत आहेत.

पूर्वी मोठ्या-खर्चिक विवाहांत ५०० पाहुण्यांवर दीड ते दोन कोटी रुपये खर्च होत असत, पण आता ५० पाहुण्यांमुळे खर्च सुमारे ८० टक्क्यांपर्यंत घटला आहे. वेडिंग इंडस्ट्रीशी दोन दशकांपासून असलेले सत्यपाल कुशवाह यांनी सांगितले, ‘मध्यमवर्गीय कुटुंबांचा मर्यादित खर्च असलेल्या लग्नसमारंभांचा खर्चही आता ३० ते ५० टक्क्यांपर्यंत घटला आहे. देशात एका मध्यमवर्गीय कुटुंबाच्या विवाह समारंभांत पाच ते २५ लाख रुपयांपर्यंत खर्च होतो. सध्या लोक लग्नासाठी मंदिरांनाही प्राधान्य देत आहेत.’ दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाजवळील आर्य समाज मंदिराचे पुजारी बी. के. शास्त्री यांनी सांगितले, ‘गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आमच्या मंदिरात लग्नाच्या नोंदणीत दीड पट वाढ झाली आहे.

देशात शूटिंग आणि विशेष फिल्मी सेटसाठी प्रख्यात असलेल्या हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीचे सीईओ राजीव जालनापूरकर यांनीही सांगितले की, बहुतांश लोकांना एखाद्या चित्रपटाच्या गाण्याचे शूटिंग झाले असेल अशा ठिकाणी किंवा सेट्सवर विवाह करणे आवडते. फिल्म सिटीत प्रत्येक प्रकारचे सेट्स आहेत. त्यामुळे आम्हाला समस्या येत नाही. आम्ही गेल्या वर्षी जवळपास २५ विवाहांचे बुकिंग केले होते. पण यंदा डिसेंबर २०२० पर्यंत ४५ विवाहांचेच बुकिंग झाले आहे. खजुराहोचे पर्यटन तज्ञ आणि वेडिंग सल्लागार सुधीर शर्मा म्हणाले की, कोरोनामुक्त असल्याने आणि हॉटेल्सनी दर कमी केल्याने आमच्या येथे गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट डेस्टिनेशन वेडिंग होत आहेत.

देशात 3 लाखांपेक्षा जास्त वेडिंग प्लॅनर
- देशात दरवर्षी सुमारे ९० लाख ते एक कोटी विवाह होतात.
- आपल्या बचतीचा ३०% भाग लग्नावर खर्च करतात भारतीय.
- वर्ष २०२० च्या अखेरपर्यंत देशात ऑनलाइन मॅट्रिमोनियल सर्चची बाजारपेठ सहा हजार कोटी रुपयांची होईल, अशी अपेक्षा आहे.
- दरवर्षी २० टक्के व्यावसायिक वाढ वेडिंग इंडस्ट्रीत होत आहे. जवळपास ३ लाखांपेक्षा जास्त वेडिंग प्लॅनर देशभरात आहेत.

50% लग्नांत दागिने जुन्या दागिन्यांपासून
रिद्धी-सिद्धी बुलियनचे एमडी, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारींनी सांगितले की, लॉकडाऊननंतर आता चांगली मागणी आहे. एक्सचेंज दागिने जास्त वापरले जात आहेत हा बदल आहे. सुमारे ५०% लग्नांतील दागिने जुन्या दागिन्यांपासून बनवले जात आहेत. तरीही लग्नांत सुमारे ३५०-४०० टन सोन्याचे नवे दागिने बनवले जातात.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser