आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 302 Acres Of Land Of Kashmiri Pandits Freed From Illegal Occupation, But The Original Owners Will Not Come!

एक्सक्लुझिव्ह:काश्मिरी पंडितांची 302 एकर जमीन अवैध कब्जातून मुक्त, मात्र मूळ मालक येईनात!

हारून रशीद | श्रीनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीरमध्ये 8 हजार तक्रारींवर कारवाई, शेजाऱ्यांनीच गिळंकृत केली

जम्मू-काश्मीर प्रशासनाने काश्मिरी पंडितांच्या जमिनींवरील कब्जांच्या ८ हजार तक्रारींवर कारवाई केली आहे. १९९० मध्ये दहशतवाद्यांच्या भीतीने खोरे सोडलेल्या पंडितांच्या जमिनी त्यांच्या शेजाऱ्यांनीच हडप केल्या होत्या. ३२ वर्षांनंतर सुमारे ३०२ एकर जमीन कब्जामुक्त करण्यात आली आहे. मात्र सरकारसमोर पेच कायम आहे, कारण जमिनीचे मूळ मालक परत यायला तयार नाहीत.

कब्जा हटवण्याची ही मोहीम सरकारने एक वर्षापासून सुरू केली होती. त्याविरोधात दहशतवादी संघटनांनी पंडितांना लक्ष्य करून त्यांचे हत्यासत्र सुरू केले होते. त्यांच्या या कृतीला भीक न घालता सरकारने जमिनीवरील कब्जा सोडवण्याची मोहीम सुरूच ठेवली होती.

अत्याचारामुळे पंडितांनी घरे सोडली. तीन दशकांपासून ते जमिनीवरील कब्जा सोडवण्याची लढाई लढत होते. १९९७ मध्ये त्यांच्या संपत्ती आणि सुरक्षेसाठी ‘जम्मू आणि काश्मीर प्रवासी स्थावर मालमत्ता अधिनियम १९९७’ कायदा संमत झाला होता. मात्र तो प्रभावी पद्धतीने लागू झाला नाही. काश्मीरपासून अनेक मैल दूर असणाऱ्या पंडितांनी तक्रारी दाखल केल्या. मात्र त्यांच्या जमिनीवर कब्जा कायम होता. वर्षभरापूर्वी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कब्जा सोडवण्यासाठी विशेष पोर्टल लाँच केले. त्यावर ८ हजार तक्रारी आल्या. सर्वांवर कारवाई झाली. कब्जा करणारे शेजारीच निघाले.

पंडित कुटुंबाचे म्हणणे- परतणार की नाही माहीत नाही

बिगरमुस्लिमांवर हल्ले सुरू झाल्यामुळे १९९० सालीही खोरे न सोडणाऱ्या पंडित कुटुंबांनीही आता खोरे सोडले आहे. खोरे सोडलेल्या एका कुटुंबाने भास्करशी संवाद साधला, ‘आमच्या गावातील बहुतांश जमिनी पंडितांच्या होत्या. माझ्याकडे ६.५ कॅनाॅल जमीन आहे. आम्ही खोरे सोडले. आमच्यातील अनेक जण जम्मूत आले. आमच्या जमिनीवर गावातीलच एक जण शेती करू लागला. आता जमिनीवरील ताबा उठवण्यात आला आहे. काश्मीरला परतणार की नाही, माहीत नाही. मात्र आमच्या हक्काच्या जमिनीवर कब्जा नाही, याचे आता समाधान आहे.

मालक येईपर्यंत तहसीलदारांच्या सुरक्षेत राहणार पंडितांची जमीन

कब्जा करणाऱ्याला नोटीस दिली जाते. त्याने कब्जा सोडला तर ठीक, अन्यथा पोलिसी बळावर अतिक्रमण हटवले जाते. जमिनीचा खरा मालक परत न आल्यास तहसीलदारांकडे जमिनीचा ताबा देण्याचे निर्देश दिले जातात. मूळ मालक परत येईपर्यंत तहसीलदारांच्या संरक्षणात ही जमीन सुरक्षित ठेवली जाणार आहे.

सर्वाधिक जमिनीवर कब्जे अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाममध्ये

कब्जाच्या सर्वात जास्त तक्रारी अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला आणि बडगाम जिह्यातून आल्या होत्या. या जिल्ह्यांमध्ये पंडित मोठे जमीनदार होते. काहींनी भीतीपोटी संपत्ती विकून टाकली. मात्र अनेक पंडितांनी देखरेख करण्यासाठी जमीन शेजाऱ्याकडे सोपवली होती. काही काळानंतर या जमिनींवरही कब्जे झाले.

बातम्या आणखी आहेत...