आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3165 Tickets Sold On The Day Of The Accident, A Major Revelation In The Bridge Disaster In Morbi

दुर्घटनेच्या दिवशी 3165 तिकिटांची विक्री:मोरबीतील पूल दुर्घटनेत मोठा खुलासा

मोरबी8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१३५ लोकांचा जीव घेणाऱ्या मोरबीतील पूल दुर्घटनेत मोठा खुलासा झाला आहे. घटनेच्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी ३१६५ तिकिटे विकण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींच्या जामीन अर्जाविरोधात न्यालायात सादर केलेल्या अहवालात असे नमूद आहे. एफएसएल अहवालातील निष्कर्षाची माहिती कोर्टाला दिली. त्यानुसार, पुलाची मुख्य केबल गंजलेली होती. अँगल्सनाही गंज लागला होता. जॉइंट असलेले मुख्य बोल्ट तीन इंचांपर्यंत उघडे पडलेले होते. पोलिसांचे म्हणणे आहे की, पुलाची देखभाल दुरुस्ती-संचालन करणाऱ्या कंपनीच्या लोकांमध्ये ताळमेळाचा अभाव होता. त्यामुळे जास्त तिकिटे विकली होती.

बातम्या आणखी आहेत...