आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रादेशिक पक्षांत निवडणूक रोख्याच्या उत्पन्नात तामिळनाडूचा सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम(द्रमुक) २०२१-२२ मध्ये अव्वल राहिला. त्याला ३१८.७५ कोटी रु. मिळाले. या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर ओडिशाची सत्ताधारी बिजू जनता दल (बिजद) आहे. त्याला निवडणूक रोख्यांतून ३०७.२९ कोटी रु. प्राप्त झाले. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या(एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे. अहवालानुसार, काँग्रेस, जेडीयू, सपा, आप, अकाली दल, एमजीपी आणि टीडीपीसारख्या १० प्रादेशिक पक्षांनी निवडणूक रोख्यांद्वारे २०२१-२२ मध्ये ८५२.८८ कोटी रु. निधी प्राप्त केला. एडीआरने निवडणूक आयोगाकडील ५४ पैकी ३६ प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्न आण खर्चाचे विश्लेषण केले. त्यांनी सुमारे १२१३ कोटी रु. प्राप्त केले आणि केवळ २८८ कोटी रु. खर्च केले. म्हणजे, ७६.२५% खर्चच केला नाही. अहवालानुसार, द्रमुकला मिळालेल्या निधी पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या २६.२७% आहे. यानंतर बिजदला २५.३३ टक्के मिळाले. टीआरएसने २१८ कोटी रु. उत्पन्न दाखवले. अव्वल पाच पक्षांत एकूण उत्पन्न १०२४.४२४ कोटी रु. आहे.
२० पक्षांचे उत्पन्न वाढले, १५ पक्षांचे घटले
अहवालानुसार, २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये २० पक्षांचे उत्पन्न वाढले आणि १५ पक्षांनी उत्पन्नात घसरण केली. ३५ पक्षांचे एकूण उत्पन्न २०२०-२१ मध्ये ५६५.४२४ कोटी रुपयांवरून वाढून २०२१-२२ मध्ये १,२१२.७०८ कोटी रु. झाले. ही ११४.४८% वाढ आहे.
{द्रमुकचे उत्पन्न सर्वाधिक राहिले. यासोबत त्याने सर्वाधिक २८३ कोटी रु.ची बचतही केली. उत्पन्नाच्या तुलनेत त्याने कमी खर्च केला.
{याच पद्धतीने बीजदने ३०७ कोटी उत्पन्नात केवळ २८.६ कोटी रु. खर्च केले.
{ एआयडीएमकेने २५ कोटी रु.उत्पन्नापैकी २८ कोटींपेक्षा जास्त खर्च केला. जेडीयूने उत्पन्नासमान खर्च केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.