आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Pak Border Muslim Population | 32% Increase In Muslim Population Near Border; The Range Of BSF Will Be Increased To 100 Km

नवे सुरक्षा आव्हान:सीमेजवळ मुस्लिम लोकसंख्येत 32 % वाढ; बीएसएफची रेंज 100 किमीपर्यंत वाढवणार

सुजित ठाकूर | नवी दिल्ली8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश आणि आसाममधील आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमध्ये मागील १० वर्षांत अनपेक्षित लोकसंख्याशास्त्रीय (डेमोग्राफिक) बदल झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या ताज्या नोंदींच्या आधारे यूपी आणि आसामच्या पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला स्वतंत्र अहवाल पाठवला आहे. दोन्ही अहवालांनुसार २०११ पासून सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्येमध्ये ३२% वाढ झाली आहे. तर देशभरात १०% आणि १५%च्या दरम्यान बदल झाला आहे. म्हणजेच मुस्लिम लोकसंख्या सर्वसाधारण लोकसंख्येपेक्षा २०% अधिक वाढली आहे. सुरक्षा संस्था आणि राज्य पोलिसांनी हा बदल राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानला आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांनी बीएसएफच्या अधिकारक्षेत्राची रेंज ५० किमीवरून १०० किमीपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच सीमेच्या मागे १०० किमीपर्यंत तपास आणि शोध घेण्याचे अधिकार बीएसएफला असतील.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एवढा मोठा लोकसंख्येतील बदल हा केवळ लोकसंख्या वाढीचा मुद्दा नाही. भारतातील घुसखोरीची ही नवी रचना असू शकते. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचे भान ठेवून आतापासूनच जोरदार तयारी करावी लागणार आहे. कदाचित त्यामुळेच यूपी आणि आसामच्या सुरक्षा यंत्रणांनी बीएसएफची व्याप्ती वाढवण्याची शिफारस केली आहे.

गुजरात वगळून इतर सीमावर्ती राज्य पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश आणि पूर्व व उत्तर राज्यांमधील बीएसएफचे अधिकार क्षेत्र १५ किमीपर्यंत मर्यादित केले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये तपासणी केल्यानंतर ते क्षेत्र ५० किमीपर्यंत वाढवले आहे. काही राज्यांनी यावर आ‍क्षेपही घेतला होता.

पोलिसांचा अहवाल
यूपीच्या ५ जिल्ह्यांमध्ये मशिदी - मदरशांमध्ये ४ वर्षांत २५% वाढ

- नेपाळ सीमेला लागून असलेले यूपीतील पिलीभीत, खेरी, महाराजगंज, बलरामपूर आणि बहराईच या पाच जिल्ह्यांमध्ये २०११ च्या राष्ट्रीय सरासरी अंदाजापेक्षा मुस्लिम लोकसंख्या २०% पेक्षा जास्त वाढली आहे. -पंचायतींच्या नोंदींमध्ये नव्याने दाखल झालेल्यांपैकी किती वैध आणि किती बेकायदा आहेत हे शोधण्याचे मोठे आव्हान आता राज्य पोलिसांसमोर आहे. कारण, बाहेरचे लोक स्थायिक झाल्याचा संशयही सुरक्षा यंत्रणांना आहे. -यूपीच्या पाच सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये १००० हून अधिक गावे स्थायिक आहेत. यापैकी ११६ गावांमध्ये मुस्लिम लोकसंख्या आता ५०% पेक्षा जास्त आहे. एकूण ३०३ गावे आहेत जिथे मुस्लिम लोकसंख्या ३० ते ५०% आहे. -एप्रिल २०१८ ते मार्च २०२२ पर्यंत यूपीच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मशिदी आणि मदरशांची संख्या २५% वाढली. २०१८ मध्ये, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये एकूण १,३४९ मशिदी आणि मदरसे होते. त्यांची संख्या आता १,६८८ झाली आहे. -सीमावर्ती भागात बऱ्याच दिवसांपासून घुसखोरी सुरू असल्याचेही पोलिसांच्या अहवालात नमूद केले आहे. बाहेरून येणारे लोक बहुतांश मुस्लिम आहेत, असे गुप्तचर अहवाल वेळोवेळी प्राप्त झाले आहेत. -बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या आसाममधील धुवरी, करीमगंज, दक्षिण सलमारा आणि काछरा जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या ३२% वाढली. २०११ च्या जनगणनेच्या राष्ट्रीय सरासरी अंदाजानुसार लोकसंख्येमध्ये १२.५% ​​ वाढ व्हायला हवी होती.

बातम्या आणखी आहेत...