आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 3.26 Lakh Tourists In Kashmir In 3 Months, 90 Flights Daily, The Highest Number Of Tourists In The Valley In A Decade| Marathi News

पर्यटकांची गर्दी:काश्मिरात 3 महिन्यांत 3.26 लाख पर्यटक, दररोज 90 विमानांची ये-जा, खोऱ्यात दशकातील सर्वाधिक पर्यटक, मेपर्यंत बंपर बुकिंग

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरच्या दल गेटहून मुघल गार्डनपर्यंतचा मार्ग पर्यटकांच्या हजारो वाहनांनी भरलेला आहे. येथील लोकांना हे दृश्य २०११ ची आठवण करून देत आहे, तेव्हा खोऱ्यात विक्रमी १३ लाख पर्यटक आले होते. अचानक कुटुंबासह दिल्लीहून श्रीनगरला आलेल्या आशुतोष यांनी सांगितले की, ‘येण्यापूर्वी हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग केले नव्हते. मोठ्या मुश्किलीने एका रात्रीसाठी रूम मिळाली. तीन दिवसांपासून अशीच स्थिती आहे.’ खोऱ्यात हॉटेलच्या ४० हजार खोल्यांचे ९०% तर गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्गमध्ये १००% बुकिंग झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत विक्रमी ३.२६ लाख पर्यटक आले आहेत. त्यापैकी मार्चची संख्या १.८० लाख आहे. गेल्या वर्षी ६.६ लाख लोक आले होते. त्यामुळे श्रीनगरच्या विमानतळावर पर्यटकांची गर्दी सांभाळणे कठीण होत आहे. तेथे प्रथमच एका दिवसांत ९० विमानांची ये-जा होत आहे. आता विक्रमी ७३ दिवसांत श्रीनगर-लेह हायवे खुला झाल्याने अनेक पर्यटक थेट लडाखला जात आहेत.

नवीन रोजगारांचीही निर्मिती
काश्मीर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनुसार, कलम ३७० नंतरची स्थिती आणि कोविडमुळे पर्यटन क्षेत्रात ६५ हजार रोजगार संपले होते. पण आता त्यांची भरपाई झाली असून नवीन रोजगारही निर्माण होत आहेत. हस्तशिल्प उद्योगानेही कात टाकली आहे.

एक वर्षात ५ हजार खोल्या वाढणार, टॅक्सीचीही भासतेय उणीव
इंडियन एसोसिएशन ऑफ टूर ऑपरेटर्सचे (जेअँडके चॅप्टर) अध्यक्ष नासिर शाह म्हणाले की, पर्यटकांच्या गर्दीमुळे टॅक्सींची कमतरता जाणवत आहे. सध्या खोऱ्यात ५ हजार टॅक्सी आहेत. आणखी २ हजार टॅक्सींची गरज आहे, पण परमिट नसल्याने अडचण येत आहे. येथील लोकांना पर्यटनात भवितव्य दिसत आहे. खोऱ्यात स्थलांतरित मजूर परतल्याने नव्या हॉटेलचे बांधकाम सुरू झाले आहे. पुढील वर्षापर्यंत खोऱ्यात आणखी ५ हजार खोल्या वाढतील.

हॉटेलचे दर दुप्पट वाढले, गुलमर्गमध्ये कक्षाचे भाडे ७० हजार रु. एका टूर ऑपरेटरने सांगितले की, मेपर्यंत अॅडव्हान्स बुकिंग असल्याने दर वाढले आहेत. गुलमर्गमध्ये एका कक्षाचे रात्रीचे भाडे ७० हजार रुपये आहे, ते आधी २० हजार होते. हॉटेलची खोलीही पूर्वी २ हजारांत मिळत होती, तिचे बुकिंग आता ४ हजारांत होत आहे.

वाइल्ड ट्युलिप गार्डनसह ४५ नवीन स्थळे खुली होणार
पर्यटन विभागाचे संचालक जी. एन. इटू यांनी सांगितले की, पर्यटक जास्त आकर्षित व्हावेत म्हणून काश्मीरमध्ये ४५, जम्मूत ३० नवीन पर्यटनस्थळे खुली करत आहोत. स्थिती सामान्य राहिल्यास पर्यटक नियंत्रण रेषेजवळ गुरेज, उरी, तंगदार येथेही जाऊ शकतील. विभाग पंपोरमध्ये वाइल्ड ट्युलिप गार्डन विकसित करत आहे. तेथे १ लाखांवर वाइल्ड ट्युलिप उगवतात.

बातम्या आणखी आहेत...