आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 33 Fighter Jets Will Come From Russia, 59 MiG 29s Will Be Upgraded; Defense Deal Worth Rs 38,900 Crore Against India China Tensions

संरक्षण करार:रशियातून येतील 33 लढाऊ विमाने, 59 मिग-29 विमाने अपग्रेड होतील; भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 38,900 कोटींचे संरक्षण करार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खरेदी आणि अपग्रेडेशनवर 1 कोटी खर्च होणार, मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा

चीनसोबत वाद सुरू असतानाच भारत सरकारने रशियाकडून ३३ लढाऊ विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यात १२ एसयू-३० एमकेआय आणि २१ मिग-२९ यांचा समावेश आहे. तसेच हवाईदलाकडे असलेली ५९ मिग-२९ लढाऊ विमाने अपग्रेड केली जातील. खरेदी व आधुनिकीकरणावर १८,१४८ कोटी रुपये खर्च येणार आहे. संरक्षण मंत्रालयाने तिन्ही दलांच्या आवश्यकतेनुसार ३८९०० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.

मंजुरीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पुतीन यांना २०३६ पर्यंत राष्ट्रपती निवडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. रशियात घटना दुरुस्ती करत अशी तरतूद करण्यात आली. यासाठी मतदान घेण्यात आले. निकाल आता जाहीर होताहेत. पुतीन म्हणाले की, भारत व रशिया यांच्यातील संबंध दृढ होतील.

२४८ अस्त्र क्षेपणास्त्रेही खरेदी केली जातील

संरक्षण मंत्रालयाने २४८ अस्त्र क्षेपणास्त्रे खरेदी करण्यासही मंजुरी देण्यात आली. ते हवाईदल आणि नौदलासाठी आहेत. संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, ३१ हजार कोटी रु. मेक इन इंडिया, म्हणजे भारतात अपग्रेड होणारी विमाने, पिनाका रॉकेट लाँचरचा दारूगोळा आदींवर खर्च होतील.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचा लडाख दौरा स्थगित

संरक्षणमंत्री राजनाथ यांनी लडाख दौरा स्थगित केला. ते शुक्रवारी एलएसीवर स्थितीचा आढावा घेणार होते. दाैऱ्याची नवी तारीख लवकरच जाहीर केली जाईल.दरम्यान, तणाव बघता लष्कारने पँगोंग त्सो झीलमध्ये एक डझन वेगवान इंटरसेप्टर नौका तैनात करण्याचा निर्णय झाला आहे.

चिनी अॅपवर बंदी, डिजिटल स्ट्राइक : प्रसाद

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी चिनी अॅपवर बंदी घालण्याला डिजिटल स्ट्राइक म्हटले. प्रसाद यांनी ऑनलाइन रॅलीद्वारे बंगालच्या नागरिकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गलवानमध्ये आमचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे दुप्पट सैनिक मारले गेले.

गुगलने सर्व ५९ चिनी अॅप प्ले स्टोअरवरून हटवले

गुगलने प्ले स्टोअरवरून केंद्र सरकारने २९ जून रोजी बंदी घातलेले ५९ चिनी अॅप हटवले आहेत. गुगलने म्हटले आहे की, ते सरकारच्या अंतरिम आदेशाचा आढावा घेत असून संबंधित डेव्हलपर्सना आधीच सूचना दिली आहे.

पीएम केअर फंडात चिनी कंपन्यांनी दिले १०० कोटी : काँग्रेस

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मोदींवर आरोप केला की, त्यांनी चिनी कंपन्यांकडून पीएम केअर फंडात १०० कोटी रुपये घेतले आहेत. पैसे देणाऱ्या कंपन्यात शाओमी, हुवावे व टिकटॉकचा समावेश आहे.

0