आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे आश्वासन:हिमाचलमध्ये महिलांना नोकऱ्यांमध्ये 33% आरक्षण देणार

सिमला22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून यात राज्याच्या विकासकामांवर भर देताना हिंदुत्वाचा अजेंडाही पक्षाने जोडला आहे. महिलांसाठी वेगळा जाहीरनामा देताना पक्षाने सरकारी नोकऱ्यांत महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासनही दिले आहे.

हा जाहीरनामा प्रसिद्ध करताना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी रविवारी सांगितले, सहावी ते १२वीपर्यंतच्या मुलींसाठी सायकल आणि महाविद्यालयीन मुलींसाठी स्कूटी दिली जाईल. टप्प्याटप्प्याने आठ लाख रोजगार उपलब्ध करून देताना स्टार्टअप योजनेसाठी ९०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल. पाच नवी वैद्यकीय महाविद्यालये उघडली जातील. शिवाय सर्व गावे पक्क्या रस्त्यांनी जोडली जातील.

समान नागरी कायद्यावर पक्ष ठाम असून यासाठी एक समिती नियुक्त केली जाणार आहे. धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केले जातील. वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण केले जाईल, अशी आश्वासने भाजपने या जाहीरनाम्यात दिली आहेत.

बातम्या आणखी आहेत...