आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूर सरकारची उपाय योजना:तस्करी, घुसखोरी रोखण्यासाठी मणिपूरमध्ये 34 नवीन ठाणी

इंफाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्यानमारजवळील सीमेवरून वाढणारी घुसखोरी व ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी मणिपूर सरकारने राज्यातील पाच सीमावर्ती जिल्ह्यांत ३४ पोलिस ठाणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चंदेल, उखरुल, टेंग्नोउपाल, काम्जोंग, चुराचांदपूर जिल्ह्यांत नवीन ठाणी सुरू होतील. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या म्हणण्यानुसार सीमावर्ती भागातील घुसखोरी व ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणाले, म्यानमारजवळी सीमेवर बेहियांगपासून जेस्सामीपर्यंतच्या भागात ही ३४ ठाणी सुरू केली जाणार आहेत.

राज्यात म्यानमार सीमेवरून बेकायदा घुसखोरी व ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी इतर उपायांव्यतिरिक्त ही व्यवस्था गरजेची आहे. या पाच जिल्ह्यांच्या सीमा म्यानमारला लागून आहेत. सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार याव्यतिरिक्त म्यानमारहून नागालँड, अरुणाचल प्रदेश, मिझोरामच्या सीमाही लागून आहेत. या राज्यांतही घुसखोरी व तस्करी याच मोठ्या समस्या दिसतात. दैनिक भास्करने अलीकडेच म्यानमारहून मिझोराममध्ये होणाऱ्या आणि वाढत्या ड्रग्ज, वन्यजीव तस्करीसंबंधी ग्राउंड रिपोर्ट प्रकाशित केला होता. मणिपूरलगत असलेल्या चारशे किलोमीटरचा म्यानमार सीमेवरील सव्वापाच किमी भागात काटेरी कुंपण लावलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...