आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेव्हीत प्रथमच 341 महिला सहभागी:3 हजार अग्निवीरांचाही सहभाग, नौदलप्रमुख आर. हरिकुमार यांची माहिती,

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नौदलप्रमुख अॅडमिरल आर.हरिकुमार यांनी शनिवारी सांगितले की, नौदलात प्रथमच महिलांना सहभागी केले आहे.अग्निवीर योजनेअंतर्गत ३४१ महिलांची नौदलात भरती झाली आहे. आतापर्यंत नौदलात एकूण ३ हजार अग्निवीर सहभागी झाले आहेत. याच पद्धतीने अग्निवीरांची पहिली तुकडी तयार झाली आहे. अॅडमिरल कुमार नौदल दनिाच्या एक दिवस आधी बोलत होते. त्यांनी सांगितले की, आता नौदलाच्या सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहतील.

२५ वर्षांमध्ये नौदल स्वावलंबी होणार नौदल प्रमुखांनी सरकारला दिलेल्या आश्वासनात सांगितले की, दल २०४७ पर्यंत स्वावलंबी होईल. त्यांनी सांगितले की, आम्ही हिंद महासागर क्षेत्रात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. एका वर्षामध्ये भारत आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे सागरी सुरक्षेचे महत्त्व बरेच वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...