आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइतिहासात प्रथमच नौदलात महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. अग्निवीर योजनेंतर्गत नौदलात 341 महिलांची भरती करण्यात आली. तसेच महिला अधिकाऱ्यांना देखील पुढील वर्षापासून नौदलात सामावून घेतले जाणार आहे, असे माहिती नौदलाचे प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार यांनी शनिवारी दिली.
नौदल दिनाच्या पुर्वसंध्येला त्यांनी नौदल प्रमुखांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तरपणे सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत एकूण 3000 अग्निवीर नौदलात सामील झाले आहेत. अशा प्रकारे अग्निवीरांची पहिली तुकडी तयार करण्यात आली आहे. आता नौदलाच्या सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही 2023 पर्यंत केवळ 7-8 शाखांमध्येच नव्हे तर सर्व शाखांमध्ये महिला अधिकार्यांचा समावेश करण्याचा विचार करत आहोत.
25 वर्षात नौदल स्वयंपूर्ण होईल
नौदल प्रमुखांनी सरकारला आश्वासन दिले आहे की, ते 2047 पर्यंत म्हणजे पुढील 25 वर्षांमध्ये नौदल 'आत्मनिर्भर' होईल. हिंदी महासागर क्षेत्रातील चीनच्या कारवायांवर नौदलाचे पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत. गेल्या वर्षभरात भारत आणि चीनमध्ये वाढलेल्या तणावामुळे सागरी सुरक्षेला महत्त्व आले आहे.
भारत USकडून प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार
चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत अमेरिकेकडून प्री-डेटर ड्रोन खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भारत 3 अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून 30 MQ-9B प्रीडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. विशेष ड्रोनच्या तंत्रज्ञानामुळे हेलफायर मिसाइलचे लॉंचिंग करण्यात आले. तर या ड्रोनच्या माध्यमातून अल-कायदाचा दहशतवादी अल-जवाहिरीही याचाही खात्मा केला गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.