आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कृषी कायद्याविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 20 वा दिवस आहे. या आंदोलनाचा परिणाम तीन राज्यांच्या अर्थव्यवस्थेवर पडण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दररोज 3500 कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया (ASSOCHAM) ने दावा केला आहे. यामुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे. या राज्यांची अर्थव्यवस्था परस्पर जोडलेली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे परिवहन यंत्रणेवर परिणाम झाला असून पुरवठा साखळी तुटली आहे. यामुळे देशभरातील फळ आणि भाज्यांचे दर वाढले आहेत.
देशात लॉकडाउन उघडण्यास सुरूवात होत असताना हे आंदोलन छेडले गेले. याचा फटका शेतकरी, ग्राहक आणि उद्योगांना बसत आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे आवाहन चेंबरच्या सरचिटणीस यांनी सरकारला केले आहे. त्याचबरोबर शेतकरी संघटना आपल्या मागण्यांविषयी मागे हटण्यास तयार नाहीत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.