आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरातील बँकांमध्ये गेल्या १० वर्षांपासून पडून असलेली सुमारे ३५ हजार १२ कोटी रुपये एवढी रक्कम अखेर रिझर्व्ह बँकेत जमा करण्यात आली आहे. या रकमेवर दावा सांगण्यात आला नसल्यामुळे ती आरबीआयकडे जमा झाली.
देशातील अशा निष्क्रिय खात्यांची संख्या १०.२४ कोटी आहे. त्यावरील रक्कम फेब्रुवारी २०२३ च्या शेवटी आरबीआयकडे हस्तांतरित करण्यात आली. ही खाती दहा वर्षांपासून सक्रिय नव्हती, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी लोकसभेत दिली. एका प्रश्नावर कराड यांनी हे लेखी उत्तर दिले. निष्क्रिय खात्याबाबत नातेवाइकांकडून बँकेकडे विचारणा होणे अपेक्षित असते. त्यात मृत्यू प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे जमा करून तशा प्रकारचा दावा करावा लागतो. मात्र, कोणत्याही स्वरूपाचा दावा न करण्यात आल्याने अशी बँक खाती निष्क्रिय श्रेणीमध्ये समाविष्ट केली जातात. बँका सहकार्य करत नसल्यास त्याबाबत मदत केली जाते.
एसबीआयमध्ये सर्वाधिक रक्कम देशात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अशा निष्क्रिय खात्यांत सर्वाधिक बेवारस रक्कम आढळली. अशा बिनदाव्यांच्या खात्यात सुमारे ८ हजार ८६ कोटी रुपयांची ठेव होती. त्यानंतर पंजाब नॅशनल बँक-५३४० कोटी, कॅनरा बँक- ४५५८ कोटी रुपये, बँक ऑफ बडोदा-३,९०४ कोटी रुपये एवढ्या रकमेवर कोणाचाही दावा सांगण्यात आलेला नव्हता. ही खाती निष्क्रिय स्वरूपात होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.