आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • 3.54 Lakh New Corona Cases In Last 24 Hours, 2806 Deaths, 2.14 Lakh Recovery Cases

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:मागील चोवीस तासात 3.54 लाख नवीन केस, 2806 लोकांचा मृत्यू, बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी 2.14 लाख

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशात कोरोनाची दुसरी लाट दिवसेंदिवस घातक होत चालली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी 3.5 लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. सुदैवाने बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी म्हणजे 2.14 लाख असून यासोबतच देशात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या 1.42 कोटी झाली आहे. महाराष्ट्रात रविवारी 66,161 नवे रुग्ण आढळले तर 61,450 बरे झाले. छत्तीसगडमध्ये 12,666 नवे रुग्ण आढळले तर 11,065 कोरोनामुक्त झाले.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन केस - 3.54 लाख
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 2,806
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 2.18 लाख
 • आतापर्यंत एकूण संक्रमित : 1.73 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झाले : 1.42 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 1.95 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेले एकूण रुग्ण : 28.07 लाख

ऍक्टिव्ह रुग्ण 28 लाखांच्या पुढे
देशामध्ये ऍक्टिव्ह केस म्हणजे उपचार सुरु असलेल्या रुग्णांच्या संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. सध्या देशात 28 लाख 7 हजार 333 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

बातम्या आणखी आहेत...