आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्या:360 फूट लांब, 235 फूट चौरस असेल राम मंदिर, 32 पायऱ्या! निधी उभारणीचे अभियान 14 जानेवारीपासून चालेल

वाराणसी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम मकर संक्रांतीपासून सुरू होणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस व विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी शुक्रवारी दिली. संत समितीच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी ते येथे आले होते. ते पत्रकारांशी बोलत होते.

मकर संक्रांतीपर्यंत मंदिराचा नकाशा तयार होईल. मंदिर ३६० फूट लांब, २३५ फूट चौरस असेल. मंदिराच्या शिखराची उंची १६१ फूट असेल. दर्शनासाठी भाविकांना ३२ पायऱ्या चढाव्या लागतील. त्यांची उंची साडेसोळा फूट असेल. मंदिराला बळकट व दीर्घायू करण्यासाठी मुंबई, गुवाहाटी, चेन्नई आयआयटीसह देशातील मोठे अभियंते, संशोधकांची टीम कार्यरत आहे. मंदिराच्या पायासाठी लोखंडाऐवजी तांब्याचा वापर केला जाणार आहे.

निधी उभारणीचे अभियान १४ जानेवारीपासून चालेल : चंपत राय म्हणाले, निधी उभारणीचे अभियान १४ जानेवारीपासून सुरू होईल. ते २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. कोठूनही सोन्याची वीट आलेली नाही. मात्र चांदीचे दान मिळू लागले आहे. लाखो कार्यकर्ते घरोघर जाऊन पैसा संकलित करतील. लोकांनी मोठ्या प्रमाणात दान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser