आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • 36,126 New Cases Were Found On The Last Day, 37,934 Were Cured; Active Cases Increased For The Fifth Consecutive Day In Kerala

कोरोना देशात:शनिवारी 36,126  नवीन प्रकरणे आली समोर, 37,934 झाले बरे; केरळमध्ये सलग 5 व्या दिवशी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांमध्ये झाली वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • शनिवारी महाराष्ट्रात 5,787 लोक संक्रमित आढळले.

शनिवारी देशात कोरोना संक्रमणाची 36,126 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली. या दरम्यान, 491 लोकांचा मृत्यू झाला, तर 37,934 संक्रमित लोकांनी या आजारावर मात केली. आतापर्यंत, देशातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 3.21 कोटीपेक्षा जास्त झाली आहे आणि 4.31 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

केरळमधील परिस्थिती अजूनही भीषण आहे. येथे सलग पाचव्या दिवशी सक्रिय प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. रविवारी 242 ची वाढ होऊन संख्या 1,80,244 झाली. सोमवारी, राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1,69,511 होती. आतापर्यंत येथे 18,499 लोकांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती
शनिवारी येथे 5,787 लोक संक्रमित आढळले. 5,352 लोक बरे झाले आणि 179 लोकांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 63.87 लाख लोक संक्रमणाच्या विळख्यात सापडले आहेत. यापैकी 61.86 लाख लोक बरे झाले आहेत, तर 1.34 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 63,262 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

देशात कोरोना महामारी आकड्यांमध्ये

 • गेल्या 24 तासांत एकूण नवीन केस आल्या : 36,126
 • गेल्या 24 तासात एकूण बरे झाले: 37,934
 • गेल्या 24 तासात एकूण मृत्यू: 491
 • आतापर्यंत एकूण संक्रमित झाले: 3.21 कोटी
 • आतापर्यंत बरे झाले: 3.13 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू: 4.31 लाख
 • सध्या उपचार करत असलेल्या रुग्णांची एकूण संख्या: 3.79 लाख
बातम्या आणखी आहेत...