आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 36th National Games Scheduled For October November In Goa Postponed Indefinitely Due To The COVID 19 Pandemic

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना इफेक्ट:गोव्यात होणारे 36वे नॅशनल गेम्स अनिश्चित काळासाठी स्थगित, मागच्यावर्षी निवडणुकीमुळे रद्द झाले होते

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्याचे खेळमंत्री म्हणाले- नवीन तारीख ठरवण्यासाठी ऑर्गनायजेशन कमेटी सप्टेंबरमध्ये बैठक घेणार

कोरोना व्हायरसमुळे गोव्यात होणारे 36वे नॅशनल गेम्स अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आले आहेत. यावर्षी 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत हे खेळ होणार होते. याआधी हे खेळ नोव्हेंबर 2018 मध्ये खेळवले जाणार होते. पण, एप्रिल 2019 पर्यंत पुढे ढकलण्यात आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीमुळे गोवा सरकारने हे खेळ परत एकदा पुढे ढकलले होते.

भारतीय ऑलंपिक संघ (आयओए) चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी नुकतंच गोवा सरकारसोबत नॅशनल गेम्सचे आयोजन ठरलेल्या वेळापत्रकानुसार खेळवण्यासंबंधी चर्चा केली होती. पण, देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे या खेळांना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

सप्टेंबरच्या बैठकीत नवीन तारीख ठरेल

गोव्याचे क्रीडा मंत्री मनोहर अजगांवकर म्हणाले की, नॅशनल गेम्सच्या ऑर्गनायजेशन कमेटीने कोरोना महामारीमुळे खेळांना पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमध्ये नवीन तारीख ठरवली जाईल.

बातम्या आणखी आहेत...