आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील किनारपट्टी परिसरात असलेल्या भारतीय नौदलाच्या कँपस आयएनएस आंग्रेमध्ये आतापर्यंत 38 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी 12 जण पूर्णपणे ठीक झाले आहेत. सध्या कोरोना प्रभावित आयएनएस आंग्रे परिसराला सील करुन पॉझिटिव्ह रुग्णांना कोलाबामधील नेव्हल हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
आतापर्यंत 38 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत
नेव्हीचे वाइस चीफ वाइस अॅडमिरल जी.अशोक कुमार यांनी शनिवारी सांगितले की, आयएनएस आंग्रेमध्ये आतापर्यंत 38 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. याशिवाय नेव्हीच्या कोणत्याच यूनिट, वॉरशिप किंवा सबमरीनमध्ये कोणताच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही. या 38 पॉझिटिव्हपैकी 12 जण ठीक झाले असून, त्यांना आपल्या घरीदेखील पाठवण्यात आले आहे. पुढे त्यांनी सांगितले की, आमच्या कोणत्याच शीपवर संक्रमण पोहचू नये, यासाठी पूर्व आणि पश्चिम यूनिट पूर्ण प्रयत्न करत आहे. आम्ही आमच्या जवानांच्या आरोग्याशी कोणतीच तडजोड करणार नाहीत.
आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी 14 युद्धनौका तयार
नेव्ही चीफ व्हाइस मार्शल अॅडमिनल जी अशोक कुमार पुढे म्हणाले की, कोरोना संकटामुळे आणि लॉकडाउन असल्यामुळे आखाती देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी 14 युद्धनौका तयार आहेत. यापैकी 4 वेस्टर्न नेव्हल कमांड, 4 ईस्टर्न नेव्हल कमांड आणि 3 साउदर्न नेव्हल कमांडच्या युद्धनौका आहेत.
आयएनएस-आंग्रे इंडियन नेव्हीचा एक बेस डिपो आहे
मुंबईमध्ये वेस्टर्न नेव्हल कमांडचा भाग असलेल्या आयएनएस-आंग्रे इंडियन नेव्हीचा एक बेस डिपो आहे. हा पश्चिम नौसैनिक यूनिटला लॉजिस्टिक आणि प्रशासकीय सपोर्ट देतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.